मुंबई : एका व्यक्तीने दोन महिलांसोबत केलेल्या धोकादायक बाईक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई केली. दोन महिलांनी केलेल्या धोकादायक बाईक स्टंटचा 13 सेकंदाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये, एक पुरुष त्याच्यासमोर बसलेली एक महिला आणि दुसरी मागे बसलेली महिला दिसत आहे.
धोकादायक बाईक स्टंट : व्हिडिओमध्ये, स्टंटमॅन रस्त्यावरील पुढची चाके उचलून अनेक मीटरपर्यंत गाडी चालवताना दिसत आहे. दुचाकीमध्ये दोन महिलाही स्वार आहेत. दुचाकीस्वाराच्या समोर बसलेली महिला दिसत आहे. तीनपैकी एकाही हेल्मेट घातले नव्हते. मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे. या व्हिडिओतील व्यक्तींबद्दल कोणाकडे काही माहिती असल्यास, तुम्ही आम्हाला थेट संपर्क करू शकता.
अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी या तिघांविरुद्ध आयपीसी कलम २७९ (रॅश ड्रायव्हिंग) आणि ३३६ (जीवाला धोका निर्माण करणे) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला दुचाकीस्वाराचा परवाना निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले, दुचाकीस्वाराचा माग काढण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. शहर वाहतूक पोलिसांनी व्हिडीओतील लोकांबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी थेट ट्विटरच्या माध्यमातून अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याव्यतिरिक्त, त्याच्यासोबत दुचाकीवरील दोन महिलांवरही बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 मार्च रोजी अशाच एका घटनेत, दोन किशोरांना घेऊन जाणारी बाईक वांद्रे येथील यू-ब्रिजवरून 40 फूट उंचीवरून पडली. त्यात एका 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा स्टंट व्हिडिओ धडकी भरवणारा होता.