ETV Bharat / state

Mumbai Police Threat Call: लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याची मुंबई पोलिसांना धमकी, फोन करणाऱ्याला तत्काळ अटक - लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट

मुंबईच्या लोकलमध्ये साखळी बॉम्ब स्फोट करणार असल्याची धमकी देणारा पोलिसांना कॉल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने हा कॉल आज सकाळी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केला. पोलिसांनी त्याला मुंबईतील जुहू परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे

Mumbai Police Threat Call
मुंबई पोलीस नियंत्रण कक्ष
author img

By

Published : Aug 6, 2023, 11:07 AM IST

Updated : Aug 6, 2023, 12:48 PM IST

मुंबईत - लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करणार असल्याची धमकी देणारा कॉल मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आला आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे. जुहू पोलिसांनी गांभीर्याने तपास करत धमकीचा कॉल करणाऱ्या फोन करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. अशोक मुखिया असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मूळचा बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्या संपूर्ण चौकशीनंतर सत्य समोर येणार आहे.

फोनवरील व्यक्तीने मुंबईच्या लोकलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. महिला पोलिस अधिकाऱ्याने त्याच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. जुहूच्या विलेपार्ले परिसरातून बोलत असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीने फोन बंद केला. पोलिसांनी माहिती घेण्यासाठी पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समोरच्या व्यक्तीने त्याचा फोन बंद केला होता. मात्र, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले. अज्ञात व्यक्तीने धमकी कशामुळे दिली, याबाबत जुहू पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे. आजवर मुंबई ही नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी मुंबईतील रेल्वेत साखळी बॉम्बस्फोट घडल्याची घटना होती.

संभाव्य अनर्थ टळला - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर आले असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. नुकतेच पुणे पोलिसांनी दहशतवाद्यांना अटक करून दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळला आहे. अटकेतील आरोपींची एनआयए या तपास संस्थांकडून चौकशी केली जात आहे. एनआयएने ठाण्यातून सहाव्या दहशतवाद्याला अटक केली आहे. काही दिवसांवर स्वातंत्र्य दिन आला असताना दहशतवाद्यांवरील कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा संस्थांनी हाणून पाडला- एनआयए अधिकाऱ्यांच्या तपासात अटक केलेल्या चार दहशतवाद्यांनी त्यांच्या साथीदारांसह इसिसमध्ये काही तरुणांची भरती केल्याचे समोर आले. अटकेतील दहशतवाद्यांना बॉम्ब तयार करण्याचे तांत्रिक ज्ञान आहे. दहशतवाद्यांनी तरुणांची माथी भडकविण्यासाठी प्रक्षोभक माहितीदेखील तयार केली होती. अटकेतील दहशतवादी हे इसिसचे मॉड्युल राबवित असल्याचा एनआयएला संशय आहे. भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न सुरक्षा संस्थांनी हाणून पाडला आहे.

हेही वाचा-

  1. Bomb Blast Planning : देशातील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाचा होता कट; पुण्यातील दहशतवाद्यांच्या चौकशीत मोठे खुलासे
  2. Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत विमानतळावर बॉम्बस्फोट होणार, पोलीस अधिकाऱ्याचा फोन?

Last Updated : Aug 6, 2023, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.