ETV Bharat / state

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या नागरिकांना आता लवकर मिळणार 'ई-पास' - e-pass to enter konkan news

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना लवकरात लवकर अधिकृत कागदपत्रांची तपासणी करून ई-पास देण्याचे आदेश शहरातील 12 झोनच्या डिसीपींना देण्यात आले आहेत. नागरिकांना 'फर्स्ट इन फर्स्ट आउट' या तत्वावर हे ई-पास देण्यात येत आहेत.

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या नागरिकांना आता लवकर मिळणार 'ई-पास'

author img

By

Published : Aug 10, 2020, 6:04 PM IST

मुंबई - कोरोना संक्रमण पाहता यंदा मुंबईतून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या नागरिकांना ई-पासची सुविधा अधिक जलदगतीने उपलब्ध व्हावी. म्हणून मुंबई पोलिसांकडून ई-पास देण्यासाठी त्यांच्या संकेतस्थळावर खास गणपतीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी विशेष ई-पासची सुविधा देण्यात आली आहे. या बरोबरच मुंबई शहरातील झोनल डीसीपी अधिकाऱ्यांना ई-पास देण्यासाठी विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खूश खबर आहे. आता चाकरमान्यांच्या ई-पासमधील अडथळा दूर झाला आहे. मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना लवकरात लवकर अधिकृत कागदपत्रांची तपासणी करून ई-पास देण्याचे आदेश शहरातील 12 झोनच्या डिसीपींना देण्यात आले आहेत. नागरिकांना फर्स्ट इन फर्स्ट आउट या तत्वावर हे ई-पास देण्यात येत आहेत. हे ई पास देताना नागरिकांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. हे ई-पास संबंधित नागरिकांना https://mumbaipolice.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन पास घेता येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.