ETV Bharat / state

Republic Day High Alert : प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट, मुंबई पोलीस सतर्क - Intelligence Department

74 व्या प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिला आहे. शिवाजी पार्क मैदानावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

Republic Day High Alert
मुंबई पोलिसांना हाय अलर्टचा इशारा
author img

By

Published : Jan 25, 2023, 6:33 PM IST

मुंबई : संपूर्ण देशभरात उद्या 74 व्या प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. मुंबईसह देशभरात प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मुंबई पोलिसांनी सर्व सावधगिरी बाळगली आहे. शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा कट असल्याचा इशारा गुप्तचर विभागाने दिल्याने खळबळ उडाली आहे. गुप्तचर विभागाच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदान परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मुंबई पोलीस हाय अलर्टवर : गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या हवाई हल्ल्याच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षेला प्राधान्य देत शिवाजी पार्कवरील बंदोबस्तासाठी कंबर कसली आहे. मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी 26 जानेवारीला मोठी परेड होत असते. यावेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येत असते. यावर्षी मात्र गुप्तचर यंत्रणेला शिवाजी पार्क मैदानावर हवाई हल्ल्याचा कट असल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. शिवाजी पार्क तसेच अन्य संवेदनशील ठिकाणी मुंबई पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच या परिसरात कसून चौकशी केली जात आहे. श्वानपथक आणि बॉम्बशोधक आणि नाशक पथकाद्वारे देखील परिसरात तपासणी सुरू आहे.

श्वान आणि बॉम्बशोधक नाशक पथक दाखल : आज सकाळपासूनच प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडची जय्यत तयारी शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्याचप्रमाणे विशेष खबरदारी म्हणून शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच शिवाजी पार्क मैदानाची श्वान पथक आणि बॉम्बशोधक नाशक पथकाद्वारे देखील कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय उद्या शिवाजी पार्कवर येणाऱ्यांची कसून चौकशी केली जाणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. त्याचप्रमाणे साध्या वेशातील पोलीस सुद्धा करडी नजर ठेवून आहेत

राज्यपालांच्या हस्ते होणार ध्वजारोहण : दादरच्या शिवाजी पार्क मैदानात दरवर्षी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारीला आणि स्वातंत्र्य दिनाची 15 ऑगस्टला परेड होत असते. दरवर्षी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असते. यावेळी मुंबईचे मुख्यमंत्री आणि इतर मंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच आमदारही उपस्थित असतात. त्यानिमित्ताने दरवर्षी पोलिसांच्या कवायतीही होत असतात. मात्र, यंदा शिवाजी पार्कवर हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावर उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. यावेळी शिवाजी पार्कात 17 चित्ररथाचे पथसंचलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या खात्यांची माहिती पटवून देणारे हे सर्व चित्ररथ असणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.