ETV Bharat / state

मरिन ड्राइव्हवर ठिय्या आंदोलन करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. सोमवारी रात्री दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे कँडल मार्च काढण्यात येणार होता. पोलिसांनी या मार्चला अटकाव केला. तेव्हा निदर्शकांनी पोलिसांच्या अटकावामुळे मरिन ड्राइव्ह गाठत कँडलसह ठिय्या दिला. काही वेळाने पोलिसांनी त्या निदर्शकांना ताब्यात घेतले.

Mumbai: Police have detained the protesters who had gathered at Marine Drive to protest against yesterday's violence in Delhi
मरिन ड्राइव्हवर ठिय्या आंदोलन करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
author img

By

Published : Feb 25, 2020, 4:26 AM IST

मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागले. दिल्लीत ठिकठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. या हिंसक आंदोलनात दिल्ली पोलीस दलातील एक हेडकॉन्स्टेबलसह चार जणांना आपला प्राण गमवावा लागला. तर पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस जखमी झाले. आंदोलनकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे कँडल मार्च काढण्यात येणार होता. तेव्हा पोलिसांनी या मार्चला अटकाव करत निदर्शकांना ताब्यात घेतले आहे.

दिल्लीत झालेल्या हिंसाचारामुळे मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. सोमवारी रात्री दिल्लीतील आंदोलनकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ गेट वे ऑफ इंडिया येथे कँडल मार्च काढण्यात येणार होता. पोलिसांनी या मार्चला अटकाव केला. तेव्हा निदर्शकांनी पोलिसांच्या अटकावामुळे मरिन ड्राइव्ह गाठत कँडलसह ठिय्या दिला. काही वेळाने पोलिसांनी त्या निदर्शकांना ताब्यात घेतले.

दरम्यान गेट वे ऑफ इंडिया जवळ पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून बॅरिकेड्स लावून वाट बंद करण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना आधीच रोखले जात आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी याविषयी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून तातडीची बैठक घेतली आहे.

हेही वाचा -

वसुधैव कुटूंबकम संकल्पनेवर आधारित आपली संस्कृती - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

हेही वाचा -

दिल्ली हिंसाचार : अमित शाह यांनी सूत्रं हाती घेतली, तातडीने बैठक बोलावून घेतला आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.