मुंबई : हेगडे यांची ५ जून ते २० जून दरम्यान ही फसवणूक झाली असून, यासंदर्भात आंबोली पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 420 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष मेहता आणि शिवांगी लाड मेहता हे नवरा बायको असलेल्या आरोपींनी संगनमताने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीआयएफएम नावाचे ॲप सुरू केले आहे. याॲपद्वारे ब्लिस कन्सल्टंट या फार्ममध्ये गुंतवणूक केली तर गुंतवणुकीच्या एकूण दरमहा 2.5 टक्के नफा मिळेल, असे बनावट चित्र तक्रारदार उमेश शेट्टी यांना दाखवून, याॲपद्वारे 25 लाखांची गुंतवणूक करण्यास सांगितले.
30 लाखांची गुंतवणूक : उमेश शेट्टी यांचा मित्र असलेले कृष्णा हेगडे यांना देखील 30 लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. दोघांनीही गुंतवणूक केल्यानंतर दुसऱ्या महिन्यात रक्कम अगर त्याचा नफा काहीही न दिल्याने तक्रारदार उमेश शेट्टी यांनी, आशिष मेहता आणि त्याची पत्नी शिवांगी यांनी 55 लाख रुपयांची फसवणूक केल्याने तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीनंतर आंबोली पोलिसांनी आरोपी आशिष मेहता आणि पत्नी शिवांगी लाड मेहता यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम 420 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कोट्यवधी रुपयांची फसवणूक : गोरेगाव येथे कार्यरत असलेल्या ब्लिस कन्सल्टंट्स या फायनान्स कंपनीच्या आशिष मेहता आणि शिवांगी लाड मेहता यांच्याविरुद्ध अंबोली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कथित फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांची देखील या जोडप्याने फसवणूक केली आहे. कृष्णा हेगडे म्हणाले की, त्यांनी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना कथित रॅकेटची माहिती दिली. तर मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे या दाम्पत्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.