ETV Bharat / state

टीआरपी घोटाळा : मुंबई पोलिसांनी दाखल केले 1400 पानांचे आरोपपत्र; 140 साक्षीदारांचा समावेश - मुंबई पोलीस टीआरपी प्रकरण आरोपपत्र

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा प्रकरणी आतापर्यंत विशाल वेध भंडारी, राव नारायण मिस्त्री, शिरीष सतीश पट्टणशेट्टी, नारायण नंदकिशोर शर्मा, विजय राजेंद्र त्रिपाठी, उमेश चंद्रकांत मिष्रा आदींना अटक केली आहे.

trp case
टीआरपी घोटाळा
author img

By

Published : Nov 24, 2020, 9:03 PM IST

मुंबई - टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून खुलासा करण्यात आल्यानंतर यासंदर्भात आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून याची चौकशी सुरू असताना यासंदर्भात मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जवळपास 140 साक्षीदार व 1400 पानांचे हे आरोपपत्र आहे.

यामध्ये आणखी काही फरार आरोपी मुंबई पोलिसांनी नमूद केलेला आहे. आरोपींमध्ये मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात 2 खासगी वृत्त वाहिनीचे मालक-चालक, एका चित्रपट वाहिनीचे मालक-चालक आणि अन्य आरोपींचा समावेश आहे.

हेही वाचा - टीआरपी घोटाळा : दोन ठिकाणांहून 13 लाखांहून अधिक रोखड जप्त

या आरोपींना झाली आहे अटक -

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा प्रकरणी आतापर्यंत विशाल वेध भंडारी, राव नारायण मिस्त्री, शिरीष सतीश पट्टणशेट्टी, नारायण नंदकिशोर शर्मा, विजय राजेंद्र त्रिपाठी, उमेश चंद्रकांत मिष्रा, रामजी दूधनाथ शर्मा, दिनेशकुमार पन्नालाल विश्वकर्मा, हरीश कमलाकर पाटील, अभिषेक भजनदास कोळवडे, आशिष अभीदूर चौधरी व घनश्याम सिंग

32 हजार कोटींची आहे वार्षिक उलाढाल -

दरम्यान, या घोटाळाप्रकरणी ऑक्टोबर महिन्यात मुंबई पोलिसांनी खुलासा केल्यानंतर या संदर्भात आतापर्यंत केल्यानंतर मनी लॉड्रिंगची शक्यता असल्यामुळे ईडीकडूनसुद्धा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. देशात सध्या सुरू असलेल्या वाहिन्यांची वार्षिक उलाढाल ही 32 हजार कोटी रुपयांची आहे. तर टीआरपीच्या मोजमापायामुळे प्रत्येक वाहिनीच्या जाहिरातीचा दर हा ठरवला जातो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.