मुंबई : मुंबई पोलिसांनी १५ दिवसांत भाजपच्या तिसऱ्या नेत्याला क्लीन चिट दिली आहे. आता आमदार प्रसाद लाड यांना आर्थिक गुन्हे शाखेने क्लीन चिट ( Clean chit to Prasad Lad ) दिली आहे.
काय आहे प्रकरण : मुंबई महापालिकेच्या घाटकोपर विभागीय कार्यालयाने 2009 मध्ये प्रसाद लाड आणि अग्रवाल यांच्या कंपनीला 150 कोटी रुपयांचे कंत्राट दिले होते. या कंत्राटातील आर्थिक अनियमिततेचा गुन्हा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2014 मध्ये नोंदवला होता. मुंबई पोलिसांनी पुरावे उपलब्ध नसल्याची माहिती देणारा संक्षिप्त अहवाल दंडाधिकारी न्यायालयात सादर केला आहे. यामुळे प्रसाद लाड यांना क्लिन चिट मिळाली आहे.
भाजपच्या तिसऱ्या नेत्याला क्लिन चिट : एका पंधरवड्यात भाजप नेत्याला गुन्हेगारी प्रकरणात क्लीन चिट देण्याची ही तिसरी घटना आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील किरीट सोमय्या आणि प्रवीण दरेकर यांच्यानंतर प्रसाद लाड ( Clean chit to Prasad Lad ) हे भाजपचे तिसरे नेते आहेत जे मुंबई क्राइम ब्रँचमधून मुक्त झाले आहेत.