ETV Bharat / state

अबब..! लॉकडाऊन काळात 11 हजार 880 जणांवर मुंबई पोलिसांची कारवाई - Mumbai Police latest News

20 मार्च ते 12 मे या कालावधी दरम्यान मुंबई शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 11 हजार 880 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1 हजार 664 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तर 3 हजार 138 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. 7 हजार 78 आरोपींना जामिनावर सुटका मिळाली आहे.

Mumbai Police
मुंबई पोलीस
author img

By

Published : May 13, 2020, 12:59 PM IST

मुंबई - लॉकडाऊन दरम्यान मुंबईत विविध कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलीस कारवाई करण्यात येत आहे. 20 मार्च ते 12 मे या कालावधी दरम्यान मुंबई शहरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 11 हजार 880 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍या 1 हजार 664 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तर 3 हजार 138 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे. 7 हजार 78 आरोपींना जामिनावर सुटका मिळाली आहे.

मागील 24 तासात मुंबई शहरात कलम 144 नुसार पोलिसांनी 40 जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापना सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांचा समावेश आहे. ४० पैकी दक्षिण मुंबईत एकूण 9 जणांवर कारवाई करण्यात आली असून, मध्य मुंबई 12, पूर्व मुंबईत 2 जणांवर कारवाई करण्यात आली. पश्चिम मुंबई 13 आणि उत्तर मुंबईत 4 जणांवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.