ETV Bharat / state

पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणार्‍यांविरोधात कडक पाऊल उचलणार - मुंबई पोलीस आयुक्त - मुंबई पोलीस बातमी

सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, असे असताना सुद्धा सोशल माध्यमांवर 80 हजार अधिक बनावट अकाउंट बनवून मुंबई पोलिसांना शिवीगाळ करणार्‍यांच्या विरोधात आम्ही कारवाई करणार आहोत असे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.

मुंबई पोलीस आयुक्त
मुंबई पोलीस आयुक्त
author img

By

Published : Oct 6, 2020, 3:28 PM IST

मुंबई - कोरोना संक्रमणाचा सामना करताना मुंबई पोलीस खात्यातील सहा हजार अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून आत्तापर्यंत 84 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. असे असतानासुद्धा सुशांत सिंह राजपूत प्रकरणांमध्ये नाहक मुंबई पोलिसांची सोशल माध्यमांवर बनावट अकाउंटवरुन बदनामी करून पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. असे करणार्‍यांविरोधात आम्ही कडक पाऊल उचलणार असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी एम्सकडून अहवाल आला असून याच सुशांत सिंहचा मृत्यू हा आत्महत्या केल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे. एम्सच्या पथकात असलेल्या सात डॉक्टरांनी त्यांचा अहवाल दिला असून मुंबईतील कूपर रुग्णालयातील पाच डॉक्टरांचा अहवाल या अगोदर आलेला होता. या दोन्ही अहवालांमध्ये सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, असे असताना सुद्धा सोशल माध्यमांवर 80 हजार अधिक बनावट अकाउंट बनवून मुंबई पोलिसांना शिवीगाळ करणार्‍यांच्या विरोधात आम्ही कारवाई करणार आहोत असे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलेलं आहे की, मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये रिया चक्रवर्तीकडून सुशांत सिंहच्या बहिणीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध घेण्यासाठी सुशांत सिंहला प्रवृत्त केले जात असल्याचा गुन्हा आम्ही बांद्रा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करत सदरचा गुन्हा सीबीआय'कडे तपासासाठी वर्ग केलेला आहे. मात्र, सुशांत सिंह राजपूत यांच्या प्रकरणातील आमचा तपास हा सध्यातरी थांबलेला असून तो बंद करण्यात आलेला नसल्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

तर, बिहार निवडणूक लक्षात घेऊन सुशांतसिंह राजपूत प्रकरणात भाजपने राजकारण केल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून केला जात आहे. बिहार पोलीस दलाचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ते निवडणूक लढवत आहेत. आता बिहारमध्ये भाजपाचे प्रभारी म्हणून गेलेले फडणवीस हे गुप्तेश्वर पांडे यांच्या प्रचाराला जाणार का,' असा खोचक प्रश्न गृहमंत्री देशमुख यांनी विचारला आहे.

हेही वाचा - 'महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्यांच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.