ETV Bharat / state

मुंबई पोलिसांनी आदिवासी पाड्यात जाऊन साजरी केली दिवाळी

मुंबई पोलिसांनी आज मुलुंडच्या पळस पाडा या आदिवासी पाड्यात जाऊन दिवाळी साजरी केली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून या पाड्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी पुढे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला होता. केवळ जंगलात पिकविणाऱ्या भाजीपाल्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता.

Mumbai Police celebrates Diwali in tribal areas
मुंबई पोलिसांनी आदिवासी पाड्यात जाऊन केली दिवाळी साजरी
author img

By

Published : Nov 3, 2021, 10:38 PM IST

मुंबई - दिवाळी सुरू झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आहे. यामुळे विविध सामाजिक कार्यक्रम देखील राबवले जात आहेत. मुंबई पोलिसांनी देखील येथे आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासी मुलांबरोबर दिवाळी साजरा केली.

मुंबई पोलिसांनी आदिवासी पाड्यात जाऊन साजरी केली दिवाळी

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट -

मुंबई पोलिसांनी आज मुलुंडच्या पळस पाडा या आदिवासी पाड्यात जाऊन दिवाळी साजरी केली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून या पाड्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या नागरिकांनी पुढे रोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला होता. केवळ जंगलात पिकविणाऱ्या भाजीपाल्यावर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. अशात विद्यार्थ्यांसमोर शैक्षणिक समस्या देखील होत्याच. अशा परिस्थितीत यंदाची दिवाळी या आदिवासी बांधवांसाठी गोड जावी म्हणून मुंबई पोलिसांनी आज मुलुंडच्या आदिवासी पाड्यात भेट देऊन या पाड्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच सायकल देऊन दिवाळी साजरी केली.

यावेळी परिमंडळ 7 चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी या विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला. सोबतच पाड्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचादेखील आढावा घेतला. स्वतः पोलीस अधिकारी आदिवासी पाड्यात येऊन दिवाळी साजरी करत असल्यामुळे या पाड्यातील लहान मुलांमध्ये देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं.

हेही वाचा - विशेष : आनंदमय दिवाळीत स्वस्थ राहणंही गरजेचं; काळजी घेण्याचा आरोग्यतज्ञांचा सल्ला

आम्ही मुलुंड येथील पळसपाडा या ठिकाणी म्हणून पोलिसांतर्फे दिवाळी साजरा केली. खूप वेगळ्या प्रकारचा आनंद होता. आदिवासी पाड्यातील शिकणाऱ्या मुलांना अपेक्षित असणारे शैक्षणिक साहित्य आणि फराळाचे वाटप आमच्यातर्फे करण्यात आले. दिवाळीच्या निमित्ताने हीच मनोकामना करतो की या लहान मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे त्यांची प्रगती व्हावी हिच त्यांच्यासाठी दिवाळीची भेट असेल, असे परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.