ETV Bharat / state

Anil Parab News : मनपा अभियंत्यांना मारहाण; अनिल परब यांच्यासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Anil Parab for assaulting municipal engineers

खार पूर्व मुंबई मनपा कार्यालयातील अभियंत्यांना मारहाण प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यासह 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान 13 जणांची चौकशी केली असून चार जणांना अटक केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी कार्यवाहीला सुरुवात केल्याने मारहाण प्रकरण कार्यकर्त्यांच्या चांगलेच अंगलट येणार आहे.

Assaulting Municipal Engineers
अनिल परब
author img

By

Published : Jun 27, 2023, 8:04 AM IST

Updated : Jun 27, 2023, 9:21 AM IST

मुंबई : एच पूर्वकडील मुंबई मनपा कार्यालयातील सहाय्य अभियंता पाटील यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती. मनपातील भ्रष्टाचार विरोधात मनपा कार्यालयावर काढलेल्या मोर्चा दरम्यान हा प्रकार घडला होता. अभियंता पाटील यांनी वाकोला पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल आल्या नंतर पोलिसांनी कार्यवाहिला सुरुवात केली आहे. शिवसेना गटाचे आमदार आणि विभाग प्रमुख अ‍ॅड. अनिल परब यांच्यासह 25 कार्यकर्त्यांवर कलम 353, 332, 506 आणि 34 भा.द.वी नुसार गुन्हा दाखल करून दोन माजी नगरसेवक आणि दोन शाखा प्रमुखांना अटक केली आहे.

13 जणांची चौकशी, चार अटक, उर्वरित फरार : माजी नगरसेवक सदा परब, माजी नगरसेवक हाजी हलीम खान, शाखाप्रमुख संतोष कदम, शाखाप्रमुख उदय दळवी यांना अटक केलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. अभियंत्याला मारहाण प्रकरणी 13 जणांना वाकोला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सीसीटिव्ही कॅमेरे तपासून यातील काही जणांना सोडून देण्यात आले. तर चार जणांना अटक केली असून उर्वरित फरार आहेत. वेगवेगळ्या टीम बनवून वाकोला पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • #WATCH | Mumbai's Vakola Police have registered a case against more than 15 people including Uddhav Thackeray faction leader and former minister Anil Parab for allegedly assaulting a BMC official. Police have arrested 4 people in the case: Mumbai Police

    (Viral video confirmed by… pic.twitter.com/eStuSmQIND

    — ANI (@ANI) June 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर : बृहन्मुंबई महानगरपालिकेने वांद्रे पूर्व येथील ठाकरे गटाच्या एका शाखेवर बुलडोझर चालवला होता. कारवाई करताना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही शाखा अनधिकृत असल्याचे सांगितले होते. मातोश्रीपासून अगदी हाकेच्या अंतरावर ही शाखा होती. ही कारवाई करुन सरकार जाणूनबुजून ठाकरे गटाला डिवचाण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे राज्यातील वातावरण अजून जास्त तापले आहे. यामुळे मनपा कार्यालयातील अभियंत्यांना मारहाण देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. Relief To Anil Parab: साई रिसॉर्ट मनी लॉंड्रिंग प्रकरण; अनिल परबांना 21 जूनपर्यंत दिलासा
  2. Narayan Rane : नारायण राणेंची सभा उधळण्याचे प्रकरण, अनिल परबांसह शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप निश्चित
  3. Anil Parab criticizes Shinde govt : प्रत्येकाचे दिवस बदलत असतात हे लक्षात ठेवले पाहिजे; सत्ताधाऱ्यांना अनिल परब यांचा इशारा

Last Updated : Jun 27, 2023, 9:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.