ETV Bharat / state

मुंबई पोलिसांनी केली बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधूंना अटक

नातेवाईक महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुना विलेपार्ले पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

परांजपे बंधूंना अटक
परांजपे बंधूंना अटक
author img

By

Published : Jun 25, 2021, 9:34 AM IST

मुंबई - बनावट कागदपत्र बनवून फसवणूक करण्याच्या संदर्भामध्ये पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे व प्रशांत पुरुषोत्तम परांजपे या दोघांना मुंबई पोलिसांच्या विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारावर आपली फसवणूक झाल्याची तक्रार वसुंधरा डोंगरे यांनी विलेपार्ले पोलिसांकडे केली होती. यासंदर्भात विलेपार्ले पोलीस ठाण्यांमध्ये कलम 476, 467, 68, 406, 420 व 120 (ब) कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. यासंदर्भात पोलिसांकडून परांजपे बंधूंची चौकशी केली जात आहे.

नातेवाईक महिलेचीच केली फसवणूक

नातेवाईक महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक परांजपे बंधुना विलेपार्ले पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले. परांजपे बंधू हे पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. शशांक पुरुषोत्तम परांजपे (वय, 59) आणि श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे (वय, 63) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. विलेपार्ले पोलीस ठाण्यात या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वसुंधरा डोंगरे यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सीआर नं. 492/2021 कलम 476, 467, 68, 406, 420 व 120 (ब) कलमान्वये गुन्हा नोंद केली आहे.

पोलिसांनी राहत्या घरातून घेतले ताब्यात

सूत्रांच्या माहितीनुसार, फिर्यादी या परांजपे कुटुंबातील आहेत. मुंबईतील विलेपार्ले येथे परांजपे यांच्या काही जागा आहेत. ती जागा विक्री करण्यात आली. फिर्यादी या जागेच्या वारस आहेत. मात्र, फिर्यादीला कळू न देता ही जागा विक्री केली. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. याबाबत आज दुपारी विलेपार्ले पोलीस ठाण्यात खोटे दस्ताऐवज बनवून, तसेच विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांना विलेपार्ले पोलिसांच्या पथकाने रात्री पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यांना घेऊन विलेपार्ले पोलीस मुंबईला रवाना झाले आहेत. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - राजावाडी रुग्णालयातील 'त्या' प्रकरणाची त्रिसदस्यीय समिती चौकशी करुन दोन दिवसात देणार अहवाल - सुरेश काकाणी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.