मुंबई - टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांचे विशेष पथक चौकशी करत आहे. याप्रकरणी ठाणे परिसरातून 11 व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर काही वाहिन्यांच्या चालक आणि मालकांना चौकशीसाठी समन्स बजावले जाणार माहिती समोर येत आहे. त्यामुळे आणखी काही जणांची अटक होण्याची शक्यता आहे.
आशीष चौधरी (वय 50) या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आशीषवर वृत्तवाहिन्यांकडून पैसे घेऊन नागरिकांच्या घरात बॅरोमीटर लावण्याचा आरोप आहे. त्यामुळे काही वाहिन्यांच्या चालक आणि मालकांना देखील चौकशीसाठी समन्स बजावले जाणार असल्याची माहिती आहे. नागरिकांना पैसे देऊन त्यांच्या घरात बॅरोमीटर लावणे आणि निवडक चॅनेल पाहण्याची अट घालून टीआरपी मिळवण्याचा घोटाळा मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 10 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी काही संशयितांची अटक होण्याची शक्यता आहे.