मुंबई : 29 मार्चला मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने अंमली पदार्थ विरोधी (Anti narcotics cell action) विशेष मोहिमेंतर्गत गोवंडी परिसरातून एका आरोपीस 250 ग्राम एमडी ड्रगसह अटक (arrest with MD drug) केली होती. त्यानंतर त्याला ड्रग्स पुरवणाऱ्या आरोपीला राहत्या घरातून २ किलो ७६० ग्राम वजनाच्या एमडी ड्रगसह अटक करण्यात आली. या प्रकरणी या दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या प्रेमप्रकाशची 19 कोटी 58 लाख 44 हजार 550 रुपये किमतीची मालमत्ता अंमली पदार्थ विरोधी कक्षाने जप्त (seizure of property of drug trafficker) केली आहे. (drug peddler property seized Mumbai)
ड्रग तस्कराची अगडबंब मालमत्ता जप्त- त्यानंतर गुन्हाच्या पुढील तपासात एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून नालासोपारा येथील गोडाऊन, अंबरनाथ आणि अमलेश्वर गुजरात येथील फॅक्टरीतून 2400 किलोपेक्षा जास्त वजनाचे एमडी ड्रग त्याची किंमत 4856 कोटी इतकी असून तो जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रेमप्रकाश पारसनाथ सिंग यांच्या मालमत्तेची आणि बँक खात्याची माहिती घेतली असता त्याने ड्रगच्या व्यापारातून बेकायदेशीररित्या 18 कोटी 43 लाख 56 हजार 334 मूल्याचे २ फ्लॅट, ९ गाळे, १ मोटरकार आणि आरोपीसह त्याच्या कुटुंबातील सदस्या यांच्या नावे असलेली सहा बँक खात्यातील शिल्लक रक्कम १ कोटी १४ लाख ८८ हजार २१६ रुपये संपादित केल्याचे निष्पन्न झालेले आहे. आरोपी नामे प्रेम प्रकाश सिंग याचे २ फ्लॅट, ९ गाळे, १ कार आणि ६ बँक खात्यातील गोठवलेली रक्कम असे एकूण 19 कोटी 58 लाख 44 हजार 550 रुपये किमतीची मालमत्ता अंमली पदार्थ विरोधी कक्षाने जप्त केली आहे.
या पोलिसांनी बजावले कर्तव्य- याबाबत अहवाल सक्षम प्राधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. ही सर्वोच्च यशस्वी कामगिरी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, पोलीस आयुक्त डॉ. सुहास वारके, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहायक पोलीस आयुक्त सावळाराम आगवणे, अमली पदार्थ विरोधी कक्ष मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या नेतृत्वाखाली वरळी युनिटचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सावंत, पोलीस उपनिरीक्षक शैलेश देसाई आणि पथक यांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कदम हे करत आहेत.