ETV Bharat / state

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या अडीच हजार जणांवर मुंबई पोलिसांची कारवाई - मुंबई पोलीस बातमी

मुंबईत संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या 2 हजार 581 जणांविरोधात कलम 188नुसार मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Apr 7, 2020, 6:44 PM IST

मुंबई - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत विविध उपाय योजना प्रशासकीय स्तरावर केले जात आहेत. मुंबई पोलिसांकडून कलम 144 शहरात लागू करण्यात आलेला असून संचारबंदी कायम करण्यात आलेली आहे. मात्र, नियम मोडणाऱ्या 2 हजार 581 जणांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

ही कारवाई 20 मार्च ते 6 एप्रिल या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या 173 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तब्बल 387 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे तर 1 हजार 958 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडण्यात आले आहे.

मागील 24 तासांत मुंबई शहरात कलम 188नुसार पोलिसांनी तब्बल 292 जणांवर कारवाई केलेली आहे. यामध्ये विनापरवाना हॉटेल, आस्थापन सुरू ठेवणारे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणारे व अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. दक्षिण मुंबईत एकूण 47 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून मध्य मुंबई 20, पूर्व मुंबईत 106 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर पश्चिम मुंबई 60 व उत्तर मुंबई 59 जणांविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे.

हेही वाचा - Coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे 'सोशल डिस्टन्सिंग', स्वतः कार चालवत बैठकीसाठी रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.