मुंबई - दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलीस लॉकडाऊन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत. कोरोनाचे संक्रमण वाढू नये, म्हणून तोंडाला मास्क लावणे हे आवश्यक असून तसा शासनाचा नियमसुद्धा आहे. तरीही बरेचजण हे रस्त्यावर जाताना तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या 5 हजार 442 जणांवर कारवाई केली आहे.
20 मार्च ते 31 जुलै यादरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या 19 हजार 445 प्रकरणात तब्बल 44 हजार 810 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्या 7 हजार 796 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तब्बल 16 हजार 967 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे, तर 20 हजार 47 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.
लॉकडॉऊन काळामध्ये कलम 188 नुसार दक्षिण मुंबईत 1 हजार 806 गुन्हे दाखल करण्यात आले असून, मध्य मुंबईत 2 हजार 597 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर पूर्व-मुंबई तब्बल 3 हजार 138 गुन्हे दाखल झाले आहेत. तर पश्चिम मुंबईत 3 हजार 258, उत्तर मुंबईत 8 हजार 646 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संदर्भात, विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.
मास्क न वापरणाऱ्या 5 हजार 442 जणांवर मुंबई पोलिसांची कारवाई
दिवसेंदिवस मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलीस लॉकडाऊन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत. कोरोनाचे संक्रमण वाढू नये, म्हणून तोंडाला मास्क लावणे हे आवश्यक असून तसा शासनाचा नियमसुद्धा आहे. तरीही बरेचजण हे रस्त्यावर जाताना तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या 5 हजार 442 जणांवर कारवाई केली आहे.