ETV Bharat / state

हक्काच्या घरासाठी पत्राचाळवासीयांचे साखळी उपोषण सुरू

सिद्धार्थनगर येथील पत्राचाळीचा पुनर्विकास १३वर्षांपासून रखडला आहे. अगोदर बिल्डरच्या घोटाळ्यामुळे तर आता म्हाडाच्या वेळकाढू धोरणामुळे हे रहिवासी बेघर आहेत.

author img

By

Published : Feb 16, 2021, 12:28 PM IST

Agitation
आंदोलन

मुंबई - गोरेगाव सिद्धार्थनगर येथील पत्राचाळीचा पुनर्विकास अगोदर बिल्डरने आणि आता मागील तीन वर्षांपासून म्हाडाने रखडवला आहे. 13 वर्षांपासून रहिवासी बेघर असताना म्हाडाकडून वेळकाढू धोरण स्वीकारले जात आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या रहिवाशांनी आजपासून पत्राचाळ परिसरात साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे. मोठ्या संख्येने रहिवासी आपल्या कुटुंबासह उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. जोपर्यंत म्हाडा पुनर्विकासाचे काम सुरू करण्याचा निर्णय जाहीर करत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.

उपोषणाच्या ठिकाणी बोलताना नागरिक
उपोषणाच्या ठिकाणी बोलताना नागरिक

काय आहे प्रकरण -

2008 पासून पत्राचाळ पुनर्विकास रखडला आहे. गुरूआशिष बिल्डरने हा प्रकल्प नऊ जणांना विकत म्हाडाला हजार कोटीरुपयांपेक्षा अधिकचा चुना लावला आहे. तर रहिवाशांचे कोट्यवधीचे भाडे थकवत त्यांना 13 वर्ष बेघर ठेवले आहे. त्यात आता म्हाडाने बिल्डरविरोधात कडक कारवाई करत प्रकल्प आपल्या ताब्यात घेतला आहे. मात्र, प्रकल्प ताब्यात घेऊन तीन वर्षे झाली तरी म्हाडाने देखील प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केलेली नाही. आजही रहिवासी स्वतःच्या खिशातून भाडे भरत भाड्याच्या घरात राहत आहेत.

'या' आहेत मागण्या -

672 रहिवाशांचे पाच वर्षांचे भाडे थकले असून ही रक्कम कोट्यवधींच्या घरात गेली आहे. ही थकबाकी म्हाडाने त्वरित द्यावी, अशी मुख्य मागणी रहिवाशांची आहे. तर जॉनी जोसेफ अहवालानुसार पुनर्वसित इमारतीचे 40 टक्के काम झाले असताना 3 वर्षे काम पूर्ण करण्यास लागणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काम पूर्ण तयार करण्यासाठी इतका वेळ का? असा सवाल आंदोलन कर्त्यांनी केला आहे. दीड वर्षात काम पूर्ण करण्याची रहिवाशांची दुसरी मुख्य मागणी आहे. या दोन्ही मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा ठाम निर्धार आपला असल्याची माहिती रहिवासी आणि उपोषणकर्ते मकरंद परब यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. आता म्हाडा यावर काय भूमिका घेते हे पाहणे आवश्यक आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.