ETV Bharat / state

मुंबई पावसाळ्यात तुंबणार? रोबोटने गटार साफ करण्याचा पालिकेचा प्रयत्न फसला

रोबोटमुळे अनेक ठिकाणी नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याने पावसाळ्यात मुंबई तुंबणार अशी भिती नगरसेवकांनी स्थायी समितीत व्यक्त केली.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Jun 7, 2019, 11:22 PM IST

मुंबई - पावसाळ्यापूर्वी शहरात नालेसफाई केली जाते. मुंबई शहर विभागात बंदिस्त नाले असल्याने यावर्षी रोबोटने नालेसफाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, या रोबोटमुळे अनेक ठिकाणी नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याने पावसाळ्यात मुंबई तुंबणार अशी भिती नगरसेवकांनी स्थायी समितीत व्यक्त केली. रोबोटचा प्रयोग अपयशी ठरल्याने रोबो आणणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थायी समितीत नगरसेवकांनी केली.

समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख

दरवर्षी मान्सूनपुर्वी ७० टक्के नालेसफाईची कामे केली जाते. त्याकरिता कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येते. परंतु, पावसाच्या पहिल्या दणक्यातच प्रशासनाचा दावा वाहून जातो. प्रशासनाचा गलथान कारभार याला कारणीभूत आहे. यंदाही मोठ्या नाल्यांची सफाई झालेली नाही. बहुतांश नाल्यात अद्याप गाळ आहे. रेल्वेला लागून असलेले मोठे नालेही गाळांनी भरले आहेत.

विशेष म्हणजे रस्त्यालगत असलेले छोटे नालेही बंदिस्त असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून साफ करणे शक्य होत नाही. बंदिस्त नाले साफ करण्यासाठी पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा रोबोट खरेदी केला. मात्र, बंदिस्त नाले साफ करण्यात रोबोटही फेल ठरले आहेत.

बंदिस्त नाले साफ करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे कुठलीही यंत्रणा नाही. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे यंदाही मुंबई पाण्याखाली जाईल, असा आरोप समाजवादीचे नगरसेवक पालिका गटनेते रईस शेख यांनी केला. रोबोट आणणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर मान्सून दाखल होण्यापूर्वी अगोदरच योग्य प्रकारे नाले सफाईसह बंदिस्त नाले साफ करावेत, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

Intro:मुंबई -
मुंबईत पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. मुंबई शहर विभागात बंदिस्त नाले असल्याने यावर्षी रॉबटने नालेसफाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र या रॉबटमुळे अनेक ठिकाणी नालेसफाई योग्य प्रकारे झाली नसल्याने पावसाळ्यात मुंबई तुंबणार अशी भिती नगरसेवकांनी स्थायी समितीत व्यक्त केली. रॉबटचा प्रयोग अपयशी ठरल्याने रोबो आणणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थायी समितीत नगरसेवकांनी केली.Body:दरवर्षी मान्सूनपूर्व ७० टक्के नालेसफाईची कामे केली जातात. कोट्यवधी रुपयांची त्याकरिता तरतूद करण्यात येते. परंतु, पावसाच्या पहिल्या दणक्यातच प्रशासनाचा दावा वाहून जातो. प्रशासनाचा गलथान कारभार याला कारणीभूत आहे. यंदाही मोठ्या नाल्यांची सफाई झालेली नाही. बहुतांश नाले अद्याप गाळ्यात आहेत. रेल्वेला लागून असलेले मोठे नालेही गाळांनी भरले आहेत. विशेष म्हणजे रस्त्यालगत असलेले छोटे नालेही बंदिस्त असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून साफ करणे शक्य होत नाही. बंदिस्त नाले साफ करण्यासाठी पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा रोबोट खरेदी केला. मात्र बंदिस्त नाले साफ करण्यात रोबोही फेल ठरले आहेत. बंदिस्त नाले साफ करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे कुठलीही यंत्रणा नाही. प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे यंदाही मुंबई पाण्याखाली जाईल, असा आरोप समाजवादीचे नगरसेवक पालिका गटनेते रईस शेख यांनी केला. रोबो आणणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावर मान्सून दाखल होण्यापूर्वी अगोदरच योग्य प्रकारे नाले सफाईसह बंदिस्त नाले साफ करावेत, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांची बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.