ETV Bharat / state

प्रदूषणाच्या शर्यतीत लवकरच मुंबई करणार दिल्लीला 'ओव्हरटेक'

author img

By

Published : Jan 21, 2020, 1:59 AM IST

सध्या मुंबईची स्थिती पाहता मुंबईत खराब हवामान वाढले आहे. लवकरच यावर उपाययोजना न केल्यास मुंबई हे शहर दिल्लीवर प्रदूषणाच्या शर्यतीत मात करेल, अशी भीती हवामान तज्ज्ञ भगवान केसभट यांनी व्यक्त केली आहे.

mumbai
प्रदूषणाच्या शर्यतीत लवकरच मुंबई करणार दिल्लीला 'ओव्हरटेक'

मुंबई - मुंबईचे प्रदूषित हवामान सफर’च्या (सिस्टम ऑफ एअर क्वॉलिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) वेदर फोरकास्टिंगमध्ये मोजले गेले आहे. रविवार 20 जानेवारीला प्रदूषणाचे मानक (एअर क्वॉलिटी इंडेक्‍स) 200 ते 250 घरात गेले होते. सफर सिस्टीमच्या भाषेत या इंडेक्सला पुअर(खराब) असे बोलले जाते. आजच्या खराब हवामानाचा इंडेक्स पूअर विभागवार मोजला गेला आहे. सध्या मुंबईची स्थिती पाहता मुंबईत खराब हवामान वाढले आहे. लवकरच यावर उपाययोजना न केल्यास मुंबई हे शहर दिल्लीवर प्रदूषणाच्या शर्यतीत मात करेल, अशी भीती हवामान तज्ज्ञ भगवान केसभट यांनी व्यक्त केली आहे.

सफर’तर्फे मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमधील हवेच्या दर्जावर लक्ष ठेवले जाते. मुंबईत २०१९ मध्ये २३ दिवस (सर्व जानेवारीत) वायु प्रदूषणाची पातळी अत्यंत खराब (व्हेरी पुअर) होती. त्यावेळी प्रदूषणाचे मानक (एअर क्वॉलिटी इंडेक्‍स) ३०१ ते ४०० होते. 2020 या नवीन वर्षात ही अशीच परिस्थिती आहे.

ज्याप्रकारे प्रदूषित पाणी आपल्याला कळते. मात्र, प्रदूषित हवा कळत नाही आणि हे कळण्यासाठी वातावरण आणि झटका या संस्थांनी एकत्र दोन मोठ्या आकाराची फुफ्फुसे वर्दळ असलेल्या बांद्रा येथील रस्त्याच्या शेजारी लावली आहेत. वाहनांमुळे आणि धुळीमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाची भीषणता या फुफ्फुसांच्या रंग बदलण्यावरून सर्वसामान्यांना कळणार आहे. सुरवातीला हा बिल बोर्ड पूर्ण पांढरा होता. मात्र, आता तो रंग बदलत आहे. या कलाकृतीमुळे लोकांना हवा प्रदूषणाचा आपल्या शरीरावर तसेच श्वसनक्रियेवर होणारा परिणाम सहजरीत्या लक्षात येईल. विषारी हवेत राहण्याचे दूरगामी परिणाम फार घातक आहेत. जे पिढ्यानपिढ्या आपल्याला दिसू शकतात. मुंबईमध्ये अनियंत्रित ट्राफिक, बांधकाम, धूर यामुळे मोठ्या प्रमाणात हवा दूषित होत आहे. थंडीमध्ये याचा परिणाम जास्त जाणवतो. शासनाने याबाबत लवकर उपाययोजना केल्या पाहिजेत, असे केसभट यांनी सांगितले.

ही बिल बोर्ड वर दिसणारी फुफ्फुसे आहेत तरी काय ?

सद्यस्थितीत पांढरी दिसणारी ही फुफ्फुसे बनवण्यासाठी ‘हेपा’( HEPA-हाय एफिसियन्सी पार्टक्यूलेट एअर) फिल्टर्स वापरण्यात आले आहेत. हे फिल्टर्स ऑपरेशनसाठी, मास्क बनवण्यासाठी आणि धूळ पकडण्यासाठी वापरले जातात. या फुफ्फुसांच्या मागे पंखे जोडले आहेत. जे हवा खेचून घेतात ज्यामुळे संपूर्ण बिल बोर्ड खऱ्या फुफ्फुसाचा आभास तयार करतो. पुढील काही दिवसात हे फिल्टर्स हवेतील, वाहनातून निघणारे धुलीकण, पार्टिक्युलेट कण पकडण्यास सुरुवात करतील आणि त्यामुळे या कृत्रिम फुफ्फुसांचा रंग बदलण्यास सुरुवात होईल. प्रदूषणामुळे या फुफ्फुसांचा रंग काळा होईल. बिलीबोर्डवर फुफ्फुसांबरोबर एक ‘डिजिटल एयर क्वालिटी मॉनिटरही’ बसवण्यात आला आहे. या यंत्राद्वारे हवेच्या दर्ज्यावर मिनिट टू मिनिट लक्ष ठेवण शक्य होते.

Intro:मुंबई ।

मुंबईचे प्रदूषित हवामान सफर’च्या सिस्टम ऑफ एअर क्वॉलिटी वेदर फोरकास्टिंगमध्ये मोजले गेले आहे. रविवार 20 जानेवारीला प्रदूषणाचे मानक (एअर क्वॉलिटी इंडेक्‍स) 200 ते 250 घरात गेले होते. सफर सिस्टीमच्या भाषेत या इंडेक्सला पुअर(खराब) असे बोलले जाते. आजच्या खराब हवामानाचा इंडेक्स पूअर विभागवार मोजला गेला आहे. सध्या मुंबईची स्थिती पाहता मुंबईत खराब हवामान वाढले आहे. लवकरच यावर उपाययोजना न केल्यास मुंबई हे शहर दिल्लीवर प्रदूषणाच्या शर्यतीत मात करेल,अशी भीती हवामान तज्ञ भगवान केसभट यांनी व्यक्त केली आहे.Body:सफर’तर्फे (सिस्टम ऑफ एअर क्वॉलिटी वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमधील हवेच्या दर्जावर लक्ष ठेवले जाते. मुंबईत २०१९ मध्ये २३ दिवस (सर्व जानेवारीत) वायुप्रदूषणाची पातळी अत्यंत खराब (व्हेरी पुअर) होती. त्या वेळी प्रदूषणाचे मानक (एअर क्वॉलिटी इंडेक्‍स) ३०१ ते ४०० होते. 2020 या नवीन वर्षात ही अशीच परिस्थिती आहे.

ज्याप्रकारे प्रदूषित पाणी आपल्याला कळते. मात्र प्रदूषित हवा कळत नाही आणि हे कळण्यासाठी वातावरण आणि झटका या संस्थांनी एकत्र दोन मोठ्या आकाराची फुफ्फुसे वर्दळ असलेल्या बांद्रा येथील रस्त्याच्या शेजारी लावली आहेत. वाहनांमुळे व धुळीमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाची भीषणता या फुफ्फुसांच्या रंग बदलण्यावरून सर्वसामान्यांना कळणार आहे. सुरवातीला हा बील बोर्ड पूर्ण पांढरा होता मात्र तो रंग बदलत आहे. या कलाकृतीमुळे लोकांना हवा प्रदूषणाचा आपल्या शरीरावर तसेच श्वसनक्रियेवर होणारा परिणाम सहजरीत्या लक्षात येईल. विषारी हवेत राहण्याचे दूरगामी परिणाम फार घातक आहेत. जे पिढ्यानपिढ्या आपल्याला दिसू शकतात. मुंबईमध्ये अनियंत्रित ट्राफिक, बांधकाम, धूर यामुळे मोठ्या प्रमाणात हवा दूषित होत आहे. थंडीमध्ये याचा परिणाम जास्त जाणवतो. शासनाने याबाबत लवकर उपाययोजना केल्या पाहिजे असे केसभट यांनी सांगितले.

ही बिलीबोर्ड वर दिसणारी फुफ्फुसे आहेत तरी काय ?

सद्यस्थितीत पांढरी दिसणारी ही फुफ्फुसे बनवण्यासाठी ‘हेपा’( HEPA-हाय एफिसियन्सी पार्टकयूलेट ऐअर) फिल्टर्स वापरण्यात आले आहेत. हे फिल्टर्स ऑपरेशनसाठी, मास्क बनवण्यासाठी व धूळ पकडण्यासाठी वापरले जातात. या फुफ्फुसांच्या मागे पंखे जोडले गेले आहेत जे हवा खेचून घेतात ज्यामुळे संपूर्ण बिलीबोर्ड खऱ्या फुफ्फुसाचा आभास तयार करतो पुढील काही दिवसात हे फिल्टर्स हवेतील, वाहनातून निघणारे धुलीकण, पार्टिक्युलेट कण पकडण्यास सुरुवात करतील व त्यामुळे या कृत्रिम फुफ्फुसांचा रंग बदलण्यास सुरुवात होईल. प्रदूषणामुळे या फुफ्फुसांचा रंग काळा होईल. बिलीबोर्डवर फुफ्फुसांबरोबर एक ‘डिजिटल एयर क्वालिटी मोनिटरही’ बसवण्यात आला आहे. या यंत्राद्वारे हवेच्या दर्ज्यावर मिनिट टू मिनिट लक्ष ठेवण शक्य होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.