मुंबई : कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया ( Mumbai NCB files a 200 page chargesheet ) यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कारन एनसीबीने त्यांच्या विरोधात 200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.
मुंबई एनसीबीने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया ( Bharti Singh Harsh Limbachiya ) यांच्या विरोधात 200 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. त्यांना 2020 मध्ये ड्रग्सच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.
काय आहे प्रकरण मुंबईतील भारती हिच्या घरावर एनसीबीने नोव्हेंबर २०२० मध्ये छापा टाकला. यावेळी तेथून गांजा जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान भारतीसिंहने आपण ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. सुमारे 6 तासांच्या चौकशीनंतर भारतीला अटक करण्यात आली. यानंतर हर्ष लिंबाचियालाही रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांना प्रथम वैद्यकीय आणि कोरोना चाचणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. भारती आणि हर्ष यांच्यासह दोन ड्रग्ज पेडलरही कोर्टात हजर झाले. एनसीबीने भारतीचा पती हर्षचा न्यायालयाकडून रिमांड मागितला होता, पण न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळली. त्यानंतर कोर्टाने या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर दोघांनाही जामिन मिळाला होता.
कोण आहे भारती सिंह? भारती सिंह ही स्टॅण्डअप कॉमेडियन आणि अभिनेत्री आहे. तीचा जन्म 3 जुलै 1980 मध्ये झाला होता. ती पंजाबमधील असून तीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबचियासोबत लग्न केले होते. तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात 'इंडियन लाफ्टर चॅलेन्ज'मधून केली होती. त्यातील तीचे लल्ली हे पात्र फारच प्रसिद्ध झाले होते. भारती सिंहने कॉमेडी सर्कस, कॉमेडी सर्कस महासंग्राम, कॉमेडी सर्कस का जादू, कहानी कॉमेडी सर्कस की आणि कॉमेडी नाईट्स बचाओ, जुबली कॉमेडी सर्कस मध्ये काम केले आहे. तसेच तिने प्यार में ट्विस्ट मध्येही काम केले आहे. याचबरोबर तीने अनेक कार्यक्रमांचे निवेदन केले आहे.