ETV Bharat / state

प्लास्टिक मुक्तीसाठी पालिकेची धडक कारवाई, तीन दिवसांत 10 लाखांचा दंड वसूल - आदित्य ठाकरे बातमी

पालिकेच्या ब्लू स्कॉडने 5 हजार 609 दुकानांना भेटी देत 408 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे. तर 6 लाख 60 हजारांचा दंड वसूल केला आहे, अशा माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

mumbai-municipalप्लॅस्टिकमुक्तीसाठी पालिका कामाला.. ity-action-on-ban-plastic-in-mumbai
प्लॅस्टिकमुक्तीसाठी पालिका कामाला..
author img

By

Published : Mar 4, 2020, 10:21 AM IST

मुंबई- राज्य सरकराने 2018 मध्ये प्लास्टिक बंदी लागू केली आहे. त्याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून केली जात असली तरी शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर केला जात आहे. त्यामुळे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मे पर्यंत 'महाराष्ट्र प्लास्टिकमुक्त' करण्याची घोषणा केली. त्यानंतर महापालिका आता पुन्हा प्लास्टिक विरोधी कारवाई करण्यासाठी कामाला लागली आहे.

प्लॅस्टिकमुक्तीसाठी पालिका कामाला..

हेही वाचा- पाण्याची टाकी नाही, तरीही घेतला जातो पाणी कर

पालिकेच्या ब्लू स्कॉडने 5 हजार 609 दुकानांना भेटी देत 408 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे. तर 6 लाख 60 हजारांचा दंड वसूल केला आहे, अशा माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

राज्य सरकारने जून 2018 मध्ये प्लास्टिक बंदी लागू केली. त्याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेकडून करण्यात आली. त्यानुसार ब्लू स्कॉडची स्थापना करुन आतापर्यंत 16 लाख 324 दुकानांना भेटी दिल्या असून 85 हजार 840 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे. या कारवाई दरम्यान 4 कोटी 64 लाख 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यात 668 दुकानदारांनी दंड भरला नाही म्हणून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पालिकेने प्लास्टिक विरोधात आक्रमक भूमिका घेतली असली तरी मुंबईत आजही प्लास्टिकचा सर्रासपणे वापर केला जात आहे. येत्या मे पर्यंत 'महाराष्ट्र्र प्लास्टिकमुक्त' करण्याची घोषणा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार 1 मार्च पासून पालिकेने पुन्हा कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पालिकेने 1 व 2 मार्च या दोन दिवसात 4 हजार 81 ठिकाणी धाडी टाकून चार लाखांचा दंड वसूल केला होता. तर 1 हजार 28.097 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले आहे.

तीन दिवसांत 10 लाख 50 हजारांची दंड वसुली...
दुकाने व आस्थापना विभागाकडून 1 हजार 674 ठिकाणी तपासणी करुन 287.470 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्यांच्याकडून एक लाख 65 हजार दंड वसूल करण्यात आला. परवाना विभागाने 2 हजार 655 ठिकाणी तपासणी करुन 120.530 किलो प्लास्टिक जप्त केले. त्यांच्याकडून 4 लाख 95 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बाजारांमध्ये 1 हजार 280 ठिकाणी तपासणी करण्यात आली.

मात्र, या कारवाईमुळे बाजारातील किरकोळ दुकानदारांनी धसका घेतला आहे. गेल्या तीन दिवसात 1 हजार 436 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून एकूण 10 लाख 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.