ETV Bharat / state

दहावीचा टक्का वाढवण्यासाठी पालिका देणार सराव परीक्षांवर भर - Ajeykumar Jadhav

मुंबई महापालिका शाळेच्या दहावीचा निकाल यंदा २० टक्क्यांनी घसरल्याने सराव परीक्षेवर भर देण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण समितीने घेतला आहे.

अंजली नाईक , अध्यक्षा, शिक्षण समिती, मुंबई महापालिका
author img

By

Published : Jun 24, 2019, 8:19 AM IST

मुंबई - महापालिकेच्या शाळांमधील दहावीचा निकाल यंदा २० टक्क्यांनी घसरला आहे. यावर उपाय म्हणून पालिका शाळांच्या निकालाचा टक्का वाढावा म्हणून सराव परीक्षांवर भर देऊन विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेबाबत असलेली भिती कमी केली जाणार असल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी दिली.

माहिती देताना शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक

मुंबई महापालिकेकडून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण आणि शालेय साहित्य मोफत दिले जाते. टॅब आणि टॅब क्लासरूमद्वारे शिक्षण दिले जाते. त्यानंतरही यंदा दहावीच्या परीक्षेत दहावीचा निकाल २० टक्क्यांनी घसरला होता. याबाबत नुकतीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत चिंता व्यक्त केली होती. पालिका शाळांचा निकाल वाढावा म्हणून प्रयत्न केले जातील, असे नाईक यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने एक बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत शाळांचा निकाल वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.

महापालिका शाळांमधील विद्यार्थी गरिब घरातून येतात. त्यांच्या घरातील परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना शिक्षण मिळेलच असे नाही. यामुळे पालिका शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सप्टेंबरपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण शिकवला जाणार आहे. सप्टेंबरनंतर ठराविक कालावधींनंतर बोर्डाच्या परिक्षेप्रमाणे परिक्षा घेतली जाणार आहे. या परिक्षेसाठी बोर्डाप्रमाणे हॉल तिकीट दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे पेपर इतर शाळांमधील शिक्षकांकडून तपासले जाणार आहेत. यामधून विद्यार्थ्यांमध्ये काही कमतरता राहिल्यास त्यासाठी जास्त प्रयत्न करून चांगला निकाल लावतात येणे शक्य आहे, असे केल्याने विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेबाबत असलेली भितीही कमी करता येऊ शकते असे नाईक यांनी सांगितले.

Intro:मुंबई
मुंबई महापालिकेच्या शाळांमधील दहावीचा निकाल यंदा २० टक्क्यांनी घसरला आहे. यावर शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही चिंता व्यक्ते केली होती. पालिका शाळांच्या निकालाचा टक्का वाढावा म्हणून सराव परीक्षांवर भर देऊन विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेबाबत असलेली भिती कमी केली जाणार असल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी दिली. Body:मुंबई महापालिकेकडून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. टॅब आणि व्हर्चुअल क्लासरूमद्वारे शिक्षण दिले जाते. त्यानंतरही यंदा दहावीच्या परिक्षेत दहावीचा निकाल २० टक्क्यांनी घसरला होता. याबाबत नुकतीच शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत चिंता व्यक्त केली होती. पालिका शाळांचा निकाल वाढावा म्हणून प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले होते. या अनुषंगाने एका बिठाक घेण्यात आली त्या बैठकीत शाळांचा निकाल वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले.

महापालिका शाळांमधील विद्यार्थी गरिब घरातून येतात. त्यांच्या घरातील परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना शिक्षण मिळेळच असे नाही. यामुळे पालिका शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सप्टेंबर पर्यंत पूर्ण शिक्षणक्रम शिकवला जाणार आहे. सप्टेंबरनंतर ठराविक कालावधींनंतर बोर्डाच्या परिक्षेप्रमाणे परिक्षा घेतली जाणार आहे. या परिक्षेसाठी बोर्डाप्रमाणे हॉल तिकीट दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे पेपर इतर शाळांमधील शिक्षकांकडून तपासले जाणार आहेत. यामधून विद्यार्थ्यांमध्ये काही कमी राहिल्यास त्यासाठी जास्त प्रयत्न करून चांगला निकाल लावतात येणे शक्य आहे. असे केल्याने विद्यार्थ्यांमध्ये परिक्षेबाबत असलेली भितीही कमी करता येऊ शकते असे नाईक यांनी सांगितले.

अंजली नाईक यांची बाईट Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.