मुंबई : मुंबई मोनोरेल सेवा अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक देखभाल दुरुस्तीच्या कामामुळं मुंबई महानगर विकास प्राधिकरणानं दोन दिवस सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद केलेली आहे. वडाळा ते चेंबूर या दरम्यान ही महत्त्वाची अभियांत्रिकी देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबईच्या मोनोरेलनं दिवसाला 12000 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. विशेष करून चेंबूर दादर ते दक्षिण मुंबई येथील जास्त प्रवासी मोनो रेलनं प्रवास करतात. वडाळापासून ते चेंबूर पर्यंतचा मोनोरेलचा विभाग दुपारी दोन वाजेपासून दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तर वडाळापासून ते चेंबूर या दरम्यान मोनोरेल सेवेचं तांत्रिक दुरुस्ती संदर्भातील काम असणार आहेत. त्यामुळं देखील येथील सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहे. त्यामुळं अप डाऊन अशा दोन्ही दिशेच्या मोनोरेल सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद राहतील.
दुरुस्ती कामामुळं मोनोरेल बंद : मुंबई मोनोरेलनं मेट्रो रेल्वेच्या तुलनेमध्ये कमी प्रवासी प्रवास करतात. पण तरी देखील दक्षिण मुंबईतून चेंबूर वडाळा या भागामध्ये आणि मध्य रेल्वेच्या दादर परिसरातून ते घाटकोपर, कुर्ला या परिसरातून देखील हजार लोक मोनोरेलनं प्रवास करतात. त्यामुळं दोन दिवस मोनो रेलची तात्पुरती सेवा रद्द झाल्यामुळं आता त्यांना बेस्ट बस हाच पर्याय असेल. यासंदर्भात स्वप्नाली गुरव यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की "मोनोरेलमुळे चेंबूर वडाळा परिसरातील प्रवाशांना पश्चिम उपनगरात जायला किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनसकडं थेट जायला सोयीचं होतं. परंतु आता दोन दिवस देखभाल दुरुस्ती कामामुळं बंद असल्यामुळं बेस्ट बसचा पर्याय आहे. परंतु बेस्ट बस सोबत एमएमआरडीएनं नियोजन करून बेस्ट बसची संख्या या परिसरात वाढवली पाहिजे. कामावर जाण्याच्या आणि कामावरनं घरी येण्याच्या वेळामध्ये बस सेवा अतिरिक्त असल्या पाहिजेत. तर मोनोरेलच्या संदर्भात एम एम आर डी एच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं की "तातडीचं यांत्रिकी काम आहे, हे यांत्रिक काम झाल्यावर नंतर मनोरेल सुरळीत सुरू होणार आहे."
हेही वाचा :