ETV Bharat / state

मुंबईकरांसाठी 16 कोटींचे 100 चायनीज व्हेंटिलेटर; स्थायी समितीत प्रस्ताव मंजूर

मुंबईत गेल्या दोन महिन्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे आयसीयू व्हेंटिलेटरची कमतरता भासत असल्याने पालिका प्रशासनाने चायनीज कंपनीकडून 16 कोटी 17 लाख रुपये खर्चून 100 व्हेंटिलेटर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

author img

By

Published : May 1, 2021, 3:55 AM IST

Updated : May 1, 2021, 4:15 AM IST

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

मुंबई - मुंबईत गेल्या दोन महिन्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे आयसीयू व्हेंटिलेटरची कमतरता भासत असल्याने पालिका प्रशासनाने चायनीज कंपनीकडून 16 कोटी 17 लाख रुपये खर्चून 100 व्हेंटिलेटर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, महापालिका रुग्णालय व कोविड सेंटरसाठी 3 हजार बेड खरेदी केले जाणार आहेत. या दोन्ही प्रस्तावाला काल स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा - 13 जूनपर्यंत शाळा-शिक्षकांना सुट्टी, मात्र मुंबईतील शिक्षक ऑनड्युटी?

3 हजार बेड, 100 व्हेंटिलेटर

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या वर्षी फेब्रुवारीपासून मुंबईत पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढली. यामुळे ऑक्सिजन बेड, आयसीयू, व्हेंटिलेटर कमी पडू लागली. नागरिकांना बेड मिळत नसल्याने वणवण फिरावे लागले. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बेड कमी पडू लागले. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार 3 हजार साधे फोल्डिंग करता येतील असे बेड, तसेच 100 व्हेंटिलेटर खरेदी करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. पालिका रुग्णालय व कोविड सेंटर आदी ठिकाणी हे बेड आणि व्हेंटिलेटरचा वापर केला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

रुग्णांच्या सुविधेसाठी खरेदी

मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने समोर येत आहेत. रुग्णांना ऑक्सिजन बेड, आयसीयू, तसेच व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. मुंबईकरांना सोयी सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासनाने 100 व्हेंटिलेटर, तसेच 3 हजार बेड खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर सादर केला होता. रुग्णांना वैद्यकीय सोयी सुविधा मिळणे आवश्यक आहे. भविष्यातही कोरोनाची तिसरी लाट आल्यास ही साधन सामुग्री उपयोगात येणार आहे, त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.

मेड इन चायना व्हेंटिलेटर

कोरोना विषाणूची सुरुवात चीनच्या हुवांग प्रांतातून झाली. चीनबरोबर भारताने युद्धही केले आहे. चीनने भारताच्या भूभागावर कब्जाही केला होता. अशा या चीनमधील मे. शेंनझेन मिड्रे बायो मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स कंपनीकडून भारतातील मे. सन इलेक्ट्रो मेडिकल डिव्हाईसेस ही कंपनी व्हेंटिलेटर खरेदी करून त्याचा पुरवठा पालिकेला करणार आहे. महापालिका एका व्हेंटिलेटरसाठी (परिरक्षण खर्चासह) कंत्राटदाराला १६ लाख १७ हजार ७७३ रुपये प्रमाणे १६ कोटी १७ लाख ७७ हजार ३२५ रुपये अदा करणार आहे.

हेही वाचा - जनजीवन सुरळीत होण्यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी - डॉ. तात्याराव लहाने

Last Updated : May 1, 2021, 4:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.