ETV Bharat / state

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बीएमसी सज्ज - mumbai second corona wave precautions

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून सुरू झाला आहे. महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या प्रयत्नांनी कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आणली आहे. मात्र, विविध सणांच्या निमित्ताने झालेल्या गर्दीमुळे पुन्हा काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. जगभरात पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे देशातही दिल्लीसह अनेक राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिल्ली, गुजरात, गोवा आणि राजस्थान या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.

mumbai mnc
मुंबई मनपा
author img

By

Published : Nov 24, 2020, 10:35 PM IST

मुंबई - कोरोनाची दुसरी लाट येणार याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरी लाट आल्यास मुंबई महापालिका सज्ज आहे. मुंबईत कोरोना सेंटर, रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह तब्बल ७० हजार बेड्स सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून सुरू झाला आहे. महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या प्रयत्नांनी कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आणली आहे. मात्र, विविध सणांच्या निमित्ताने झालेल्या गर्दीमुळे पुन्हा काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. जगभरात पुन्हा कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे देशातही दिल्लीसह अनेक राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिल्ली, गुजरात, गोवा आणि राजस्थान या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे.

७० हजार बेड तयार -

मुंबईत दुसरी लाट आली किंवा रुग्ण संख्या वाढली तर रुग्णालय आणि कोरोना सेंटरमधील बेड तयार आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरही तयार ठेवण्यात आले आहेत. तसेच औषधांचा, इंजेक्शनचा साठा पुरेसा आहे, अशी माहिती काकाणी यांनी दिली. मुंबईत रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये एकूण ७० हजार बेड तयार ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी २० हजार बेड हे डिसीएच, डीसीएचसीसाठी राखीव असून क्रिटिकल आणि लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत, अशी माहितीही काकाणी यांनी दिली.

हेही वाचा - राज्यात ५ हजार ४३९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ३० मृत्यू

पालिकेची तयारी -

कोरोना केअर सेंटर (सीसीसी) १मध्ये रुग्णाच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क लोकांना तर कोरोना केअर सेंटर (सीसीसी) २मध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवले जाते. यासाठी ५० हजार बेड असून ते तीन टप्प्यात सुरू करण्याची तयारी आहे. सध्या ५८ कोरोना सेंटर एकटिव्ह आहेत. यापैकी १० टक्के बेड भरले आहेत. ३५ सेंटर असे आहेत जे २ दिवसाच्या नोटिसवर सुरु करता येतील. तर ४०० सेंटर असे आहेत जे ८ दिवसांच्या नोटीसवर सुरू करता येतील. गरज पडल्यास ते टप्प्याटप्याने सुरू करता येतील. सर्व ठिकाणी आधी सिलेंडरद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात होता. मात्र, आता टर्बो फॅसिलिटीद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कुठेही कमी पडणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी याबाबत प्रतिक्रिया देताना.

मुंबईत किती बेड रिक्त?

२३ नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार मुंबईतील रुग्णालयात १६ हजार ७११ बेड आहेत. त्यापैकी ५ हजार १४५ बेड भरले आहेत. तर ११ हजार ५६६ बेड रिक्त आहेत. आयसीयुचे १ हजार ९४७ बेड असून त्यापैकी १ हजार १५५ बेड भरले आहेत. तर ७९२ बेड रिक्त आहेत. ऑक्सिजनचे ८ हजार १२३ बेड असून २ हजार ६३५ बेड भरले आहेत. तर ५ हजार ४८८ बेड रिक्त आहेत. तसेच व्हेंटिलेटरचे १ हजार १६८ बेड असून ८०१ बेड भरले असून ३६७ बेड रिक्त आहेत.

हेही वाचा - 'लॉकडाऊनबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही'

मुंबईत किती रुग्ण? -

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 76 हजार 507वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 687वर पोहोचला आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 52 हजार 499वर गेला आहे. सध्या मुंबईत 10 हजार 687 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 233 दिवस तर सरासरी दर 0.30 टक्के आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.