मुंबई - दरवर्षीप्रमाणे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून पावसाळ्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष कार्यरत झाला असून तो 24 तास सुरू असणार आहे. एमएमआरडीएच्या प्रकल्पात, त्यांच्या अखत्यारीतील रस्ते यावर पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडल्यास नागरिकांना या नियंत्रण कक्षाशी संपर्क करता येणार आहे.
1 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार कक्ष
एमएमआरडीएकडून मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. तर एमटीएचएलसह अनेक प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पाच्या परिसरात पावसाळ्यात पाणी साचणे, झाडे पडणे, रस्ते खचणे यासारख्या दुर्घटना घडतात. तेव्हा अशावेळी तात्काळ मदत मिळावी यासाठी दरवर्षी पावसाळ्यात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन केला जातो. त्यानुसार असा कक्ष सुरू करण्यात आला आहे.१ जूनला हा कक्ष सुरू झाला असून तो 1 ऑक्टोबरपर्यंत कार्यरत असणार आहे. हा कक्ष राज्य सरकार, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर सरकारी यंत्रणाच्या नियंत्रण कक्षाशी संलग्नित असणार आहे.
नियंत्रण कक्षाचे हेल्पलाइन नंबर:
022-26591241 / 022-26594167
मोबाइल नंबर - 9186574020