ETV Bharat / state

महापौरांचे लक्ष वांद्रे 'पूर्व'वर, २७ रस्त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव - पक्ष

याचाच एक भाग म्हणून तब्बल २७ रस्त्यांची काम केली जाणार आहेत. तसे प्रस्ताव पालिकेच्या उद्या (बुधवारी) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. याबाबात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र ही विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचे स्पष्ट बोलण्याचे टाळले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर
author img

By

Published : Jun 18, 2019, 7:31 PM IST

मुंबई - महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख राहत असलेल्या मातोश्रीचा म्हणजेच वांद्रे पूर्व विभाग त्यांनी निवडल्याची चर्चा आहे. यासाठीच निवडणुकीपूर्वी या विभागातील कामांवर महापौरांनी लक्ष केंद्रित केले आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर.

याचाच एक भाग म्हणून तब्बल २७ रस्त्यांची काम केली जाणार आहेत. तसे प्रस्ताव पालिकेच्या उद्या (बुधवारी) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. याबाबात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र ही विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचे स्पष्ट बोलण्याचे टाळले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुंबईमधील अनेक नगरसेवकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. त्यासाठी आपल्या विभागातील नागरी विकासाची कामे करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून केला जात आहे. याला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरही अपवाद राहिलेले नाहीत.

वाकोला येथील नगरसेवक असलेले विश्वनाथ महाडेश्वर २०१७ मध्ये मुंबईचे महापौर झाले. येत्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या महापौर पदाचा कालावधी संपत आहे. याच दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. महापौर झाल्यापासून त्यांची कामगिरी चांगली राहिल्याने 'मातोश्री' महाडेश्वर यांच्यावर खुश आहे. यामुळे, महाडेश्वर यांना विधानसभेचे तिकीट नक्की मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

वाकोल्यातून नगरसेवक असलेल्या महाडेश्वर यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतरदारसंघातून उमेदवारी दिल्यास विभागातील लोकांसाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. म्हणून महापौर या विभागातील २७ रस्त्यांची दुरुस्ती व नूतनीकरणाची कामे करणार आहेत. यासाठी एस.एम. डेव्हलपर्स या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. कंत्राटदाराला १३.४९ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

पक्षात इच्छुकाला अर्थ नसतो - महापौर

शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने सर्व नगरसेवक काम करत आहेत. विधानसभेच्या दृष्टिकोनातून सगळेच नगरसेवक काम करत असतात. विधानसभेला पक्षप्रमुख जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक नगरसेवक विकासाची कामे करत आहेत. पुढील निवडणुकीची आचारसंहिता लागेल या भीतीने नगरसेवक जलद कामे करत आहेत.

मुंबईकर आम्हाला निवडून देतात. त्यांची कामे करणे हे आमचे कर्तव्य असते. आमच्या पक्षात इच्छुकाला अर्थ नसतो. पक्षप्रमुख जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून आणणे हे आमचे काम असते, असे सांगत आपल्या उमेदवारीवर बोलण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी टाळले.

Intro:मुंबई -
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिवसेनेचे पक्ष प्रमुख राहत असलेल्या मातोश्रीचा म्हणजेच वांद्रे पूर्व विभाग त्यांनी निवडल्याची चर्चा आहे. यासाठीच निवडणुकीपूर्वी या विभागातील कामांवर महापौरांनी लक्ष केंद्रित केले आहे. याचाच एक भाग म्हणून तब्बल २७ रस्त्यांची काम केली जाणार आहेत. तसे प्रस्ताव पालिकेच्या उद्या (बुधवारी) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहेत. याबाबात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र ही विधानसभा निवडणुकीची तयारी असल्याचे स्पष्ट बोलण्यास टाळले आहे. Body:लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यात विधानसभा निवडणूका होऊ घातल्या आहेत. मुंबईमधील अनेक नगरसेवकांना आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत. त्यासाठी आपल्या विभागातील नागरी विकासाची कामे करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न नगरसेवकांकडून केला जात आहे. याला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरही अपवाद राहिलेले नाहीत. वाकोला येथील नगरसेवक असलेले विश्वनाथ महाडेश्वर २०१७ मध्ये मुंबईचे महापौर झाले. येत्या सप्टेंबरमध्ये त्यांच्या महापौर पदाचा कालावधी संपत आहे. याच दरम्यान विधानसभा निवडणुका होत आहेत. महापौर झाल्यापासून वादग्रस्त ठरले नसल्याने मातोश्री महाडेश्वर यांच्यावर खुश आहे, यामुळे महाडेश्वर यांना विधानसभेचे तिकीट नक्की मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. वाकोल्यातून नगरसेवक असलेल्या महाडेश्वर यांना वांद्रे पूर्व विधानसभा मतरदारसंघातून उमेदवारी दिल्यास विभागातील लोकांसाठी काय केले असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. याची काळजी म्हणून महापौरांनी या विभागातील २७ रस्त्यांची दुरुस्ती व नुतणीकरणाची कामे करून घ्यायचे ठरवले आहे. यासाठी एस.एम. डेव्हलपर्स या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून कंत्राटदाराला १३.४९ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

पक्षात इच्छुकाला अर्थ नसतो - महापौर
शिवसेना पक्ष प्रमुखांच्या आदेशाने सर्व नगरसेवक काम करत आहेत. विधानसभेच्या दृष्टिकोनातून सगळेच नगरसेवक काम करत असतात. विधानसभेला पक्ष प्रमुख जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येक नगरसेवक विकासाची कामे करत आहेत. पुढील निवडणुकीची आचारसंहिता लागेल या भीतीने नगरसेवक जलद कामे करत आहेत. मुंबईकर आम्हाला निवडणून देतात. त्यांची कामे करणे हे आमचे कर्तव्य असते. आमच्या पक्षात इच्छुकाला अर्थ नसतो पक्षप्रमुख जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून आणणे हे आमचे काम असते असे सांगत आपल्या उमेदवारीवर बोलण्यास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी टाळले आहे.

महापौरांची बाईट
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.