मुंबई - मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या आज निवडणुका होत आहेत. या निवडणुकांना अधिकारी वर्ग वेळेवर पोहोचला नसल्याने महापौरांनी प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले. आयुक्तांना मंत्रालयात परत पाठवण्याचा इशारा देखील शिवसेनेकडून देण्यात आला. मात्र आयुक्तांनी लहान भाऊ समजून माफ करण्यास सांगितल्यावर नाराजी नाट्यावर पडदा पडला.
मुंबई महापालिकेच्या 17 प्रभाग समित्यांच्या निवडणुका आज 14 ऑक्टोबरपासून सुरू झाल्या आहेत. या निवडणुका 16 ऑक्टोबर पर्यंत संपन्न होणार आहेत. आज होणाऱ्या प्रभाग समिती निवडणुकीसाठी महापौर किशोरी पेडणेकर हजर झाल्या. मात्र अधिकारी वर्ग गैरहजर होता. वाट पाहूनही अधिकारी वर्ग पोहोचला नसल्याने नाराजी व्यक्त करत निवडणुका पार पाडण्यात अडथळा आल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधारी शिवसेना नगरसेवकाच्या उपस्थितीत आपल्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
यावेळी बोलताना, आयुक्तांच्या परवानगीने या निवडणुका सभागृहात घेण्याचे ठरले. मी स्वत: वेळेवर पोहचले. एमएस डिपार्टमेण्टचा स्टाफ, सहाय्यक आयुक्त , डीएमसी हे वेळेवर आले नाहीत. प्रथा परंपरा मोडीत काढू नका. सभागृहात नगरसेवकांचा अपमान होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. आयुक्त ज्या पद्धतीने विशाखा राऊत यांच्याशी बोलले ते सभागृह नेता खुर्चीचा अपमान केला. विशाखा राऊत यांच्या भावना दुखावल्या गेल्या. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन तक्रार करणार आहोत, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
मात्र नंतर पालिका आयुक्तांनी महापौर आणि सभागृह नेत्याना फोन करून माफी मागितली. लहान भाऊ म्हणून मला माफ करावे, असे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी सभागृह नेत्या राऊत यांना सांगितल्यावर राऊत यांनी आपण आयुक्तांना लहान भाऊ म्हणून माफ केल्याचे सांगितले. यामुळे हा वाद मिटला असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर व विशाखा राऊत यांनी दिली.
सभागृह नेत्यांशी आयुक्तांची उद्धट वागणूक, नंतर माफीनामा - Mumbai prabhag samiti election news
मुंबई महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या आज निवडणुका होत आहेत. या निवडणुकांना अधिकारी वर्ग वेळेवर पोहोचला नसल्याने महापौरांनी प्रशासनाच्या विरोधात ठिय्या आंदोलन केले.