मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जतच्या दिशेने जाणारी एस 3 लोकल ही कर्जत ते अंबरनाथ दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे अचानक सकाळी 7 वाजून 50 मिनिटांनी थांबवण्यात आली होती. त्यामुळे सर्व ट्रेन एक तास उशिराने धावत आहे. यामुळे इंद्रायणी एक्सप्रेसला देखील उशीर झाला, मध्य रेल्वेच्या डिसाळ कारभारामुळे प्रवाशांना विनाकारण कामावर जाण्यास उशीर झाला आहे.
दोन्ही बाजूच्या लोकलला अडथळा: मध्य रेल्वेच्या रेल्वे सर्व धीम्या गतीने धावत आहेत. याला कारण आज सकाळी 7 वाजून पन्नास मिनिटांनी अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक अडचण निर्माण झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडून कर्जतच्या दिशेने येणारे एस थ्री लोकल तिला तांत्रिक बिघाडामुळे थांबण्यात आले आहे. या लोकलमधील प्रवाशांना त्वरित उतरवून इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये त्यांना चढायला परवानगी दिली गेली. इंद्रायणी एक्सप्रेस थांबल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या लोकलला त्यामुळे अडथळा झाला. परिणामी एकामागे एक अशा सर्व ट्रेन ओळीने उभ्या झाल्या होते. जनतेला मात्र नाहक त्रास सोसावा लागला.
अचानक बिघड: यासंदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हे के सिंग यांच्यासोबत ईटीव्ही भारत वतीने रेल्वेच्या खोळंब्याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की, अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. मुंबईहून कर्जत दिशेला जाणारी ही लोकल होती. आणि अचानक बिघड झाल्यामुळे या लोकलमधील प्रवासांना इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये जाण्याची अनुमती दिली गेली आहे. परिणामी लोकल उशिराने धावत आहेत, असे त्यांनी सांगितले आहे.