ETV Bharat / state

ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या लोकलचे डबे घसरले.. ट्रान्स हार्बर मार्ग ठप्प

ठाणे ते वाशी मार्गादरम्यान जाणाऱ्या लोकलचे रविवारी संध्याकाळी 7.15 वाजताच्या सुमारास मुकुंद कंपणीपुढे 15/17 पोलजवळ शेवटचे दोन डबे रेल्वे ट्रॅकवरून घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे वाशी ते पनवेल दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

author img

By

Published : Aug 11, 2019, 10:11 PM IST

Updated : Aug 11, 2019, 10:25 PM IST

लोकल

मुंबई - ठाणे ते वाशी मार्गादरम्यान जाणाऱ्या लोकलचे रविवारी संध्याकाळी 7.15 वाजताच्या सुमारास मुकुंद कंपणीपुढे 15/17 पोलजवळ शेवटचे दोन डबे रेल्वे ट्रॅकवरून घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे वाशी ते पनवेल दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेमुळे ऐन संध्याकाळी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी नसून प्रवाशांना जवळच्या मार्गाने ऐरोली स्टेशनवर पोहचविण्यात आले आहे.

ठाण्याहून वाशीला जाणाऱ्या लोकलचे डबे घसरले

ठाणे कडून जाणारी हार्बर लाईन सध्या बंद असून ट्रॅक पूर्ववत करण्याचे काम रेल्वे प्रशासनाककडून चालू आहे. ठाणे कडून हार्बर लाईनला जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे ते कुर्ला व तेथून हार्बर लाईनला जाण्याबाबत ठाणे रेल्वे प्रशासनाने सूचित केले आहे. ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांना हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

गाडीमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून गाडी रिकामी करण्यात आली आहे. ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांना नवी मुंबई पालिकेच्या दोन बसेस वाशी स्थानक ते ठाणे वाया ऐरोली मार्गे सोडण्यात आल्या आहेत.

Intro:मुंबई -ठाणे ते वाशी मार्गा दरम्यान जाणाऱ्या लोकलचे आज संध्याकाळी 7.15 वाजताच्या सुमारास मुकुंद कंपणीपुढे 15/17 पोलजवळ शेवटचे दोन डबे रेल्वे ट्रकवरून घसरल्याची घटना घडली आहे. यामुळे वाशी ते पनवेल दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेमुळे ऐन संध्याकाळी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. Body:सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी नसून प्रवाशांना जवळच्या मार्गाने ऐरोली स्टेशनवर पोहचविण्यात आले आहे. ठाणे कडून जाणारी हार्बर लाईन सध्या बंद असून ट्रक पूर्ववत करण्याचे काम रेल्वे प्रशासनाककडून चालू आहे.
ठाणे कडून हार्बर लाईनला जाणाऱ्या प्रवाश्यांना ठाणे ते कुर्ला व तेथून हार्बर लाईनला जाण्याबाबत ठाणे रेल्वे प्रशासनाने सूचित केले आहे.Conclusion:ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांना हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. त्या गाडी मधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून गाडी रिकामी करण्यात आली आहे. ट्रान्स हार्बरच्या प्रवाशांना नवी मुंबई पालिकेच्या दोन बसेस वाशी स्थानक ते ठाणे वाया ऐरोली मार्गे सोडण्यात आल्या आहेत.
Last Updated : Aug 11, 2019, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.