ETV Bharat / state

Mumbai News : अचानक लो ब्लडप्रेशरमुळे ट्रेनच्या मोटरमनला आली चक्कर, सुदैवाने दुर्घटना टळली - mumbai local news

मुंबईत ट्रेनमधील मोटरमनला चक्कर आल्याची घटना समोर आली आहे. मनीष कुमार असे मोटरमनचे नाव आहे. डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचार केल्यानंतर मनिष कुमार यांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर आणखी एका मोटरमनला सोबतीला देवून ट्रेन बोरिवलीच्या दिशेने पाठवण्यात आली.

Mumbai News
लो ब्लडप्रेशरमुळे ट्रेनच्या मोटरमनला आली चक्कर
author img

By

Published : Feb 1, 2023, 10:05 AM IST

लो ब्लडप्रेशरमुळे ट्रेनच्या मोटरमनला आली चक्कर

मुंबई : मुंबईत चर्चगेट येथून बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनच्या मोटरमनला चक्कर आली. ही ट्रेन मालाड स्टेशन येथे आली असताना हा प्रकार घडला. त्वरित त्या मोटरमनची डॉक्टरांनी तपासणी केली. त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर ती लोकल ट्रेन पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आली. ट्रेन वेगात असताना चक्कर आली असती तर हजारो प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता असे मोटरमन म्हणला.

मोटरमन चक्कर येवून पडला : मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट येथून बोरिवली येथे जाणारी ९०५३९ ही ट्रेन काल मंगळवारी दुपारी १४.३० वाजता सुटली. ही ट्रेन मालाड रेल्वे स्थानकात दुपारी १५.२७ वाजता पोहचली. ही ट्रेन मनीष कुमार हे मोटरमन चालवत होते. मालाड स्टेशनवर ट्रेन आली असता मनीष कुमार हे चक्कर येवून पडले. याची माहिती त्वरित स्टेशन मास्टर यांना देण्यात आली. स्टेशन मास्टर डॉक्टरांना घेवून तातडीने ट्रेन जवळ आले. डॉक्टरांनी मोटर मनिष कुमार यांची तपासणी केली असता त्यांचा ब्लड प्रेशर लो झाल्याचे समजले. डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार केले. मनिष कुमार यांची प्रकृती स्थिर झाल्यावर आणखी एका मोटरमनला सोबतीला देवून ट्रेन बोरिवलीच्या दिशेने पाठवण्यात आली.

दुर्घटना टळली : मनीष कुमार यांचा जन्म १२ जानेवारी १९८८ चा आहे. २४ जानेवारी २०२३ मध्ये त्यांची मोटरमन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आधी त्यांनी माल गाडीचे लोको पायलट या पदावर काम केले आहे. आज प्रवासी असलेली ट्रेन चालवताना त्यांचा ब्लडप्रेशर लो झाला. यामुळे त्यांना चक्कर आली. ट्रेन स्टेशनमध्ये आली असताना हा प्रकार झाल्याने सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडलेली नाही. ट्रेन सुरु असतानाच मोटरमनला चक्कर आली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.

मुंबईची लाईफलाईन : मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ट्रेनची ओळख आहे. मध्य हार्बर आणि पश्चिम अशा मार्गांवरती सुमारे 70 लाखाहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कर्जत खोपोली कसारापर्यंत, हार्बर मार्गावरती पनवेल व गोरेगावपर्यंत प्रवास केला जातो. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावरती चर्चगेट ते विरारपर्यंत प्रवासी रेल्वे प्रवास करतात.

हेही वाचा : Budget 2023 : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.