ETV Bharat / state

मुंबई-कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे राज्याचा कायापालट! - mumbai kanyakumari economic corridor

मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरची घोषणा करत अर्थमंत्र्यांनी 64 हजार कोटींपैकी या मार्गासाठी 25000 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे हा महामार्ग आता मार्गी लागणार असून या घोषणेचे तज्ज्ञांनी स्वागत केले आहे.

mumbai kanyakumari economic corridor will  transforms maharashtra
मुंबई-कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे राज्याचा कायापालट!
author img

By

Published : Feb 1, 2021, 2:13 PM IST

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मुंबई आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई तसेच महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरची घोषणा करत अर्थमंत्र्यांनी 64 हजार कोटींपैकी या मार्गासाठी 25000 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे हा महामार्ग आता मार्गी लागणार असून या घोषणेचे तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. 1760 किमीच्या या कॉरिडॉरमुळे आजूबाजूच्या 2 किमीच्या परिसराचा सर्वांगीण विकास होईल, असे म्हणत तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

नितीन गडकरी यांनी केली होती घोषणा -

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी भारतमाला परियोजनेंतर्गत गेल्या वर्षी केरळमध्ये एका कार्यक्रमात मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरची घोषणा केली होती. हा मार्ग 1760 किमीचा असेल आणि यातील 650 किमीचा मार्ग केरळमधून जाईल. केरळमधील कासारगोड, कोची, तिरुअनंतपरम अशा शहरांना जोडणारा हा प्रकल्प असेल. तर पश्चिमी भागातील सर्व सागरी किनारपट्ट्यांना जोडत हा मार्ग जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले होते. तर भारतामाला परियोजनामधील हा सर्वात मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प असेल, असा दावा ही त्यांनी यावेळी केला होता.

50 हजार कोटीवरून खर्च 64 हजार कोटींवर -

गडकरी यांनी गेल्या वर्षी या प्रकल्पाची घोषणा केली, तेव्हा हा प्रकल्प 50 हजार कोटींचा असेल असे जाहीर केले होते. ही घोषणा होऊन काही महिनेच उलटले असून हा प्रकल्प अजूनही कागदावरच आहे. तोपर्यंत प्रकल्पाच्या खर्चात 14 हजार कोटींची वाढ झाली आहे. आज अर्थमंत्र्यांनी या प्रकल्पाची घोषणा केली, तेव्हा या प्रकल्प 64 हजार कोटींचा असल्याचे जाहीर केले आहे. तर 64 हजार कोटींपैकी 25 हजार कोटीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे.

राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प -

मुंबई-कन्याकुमारी इकॉनॉमिक कॉरिडॉर मुंबई आणि राज्यातील ज्या भागातून जाणार आहे. त्या भागांचा सर्वांगीण विकास यामुळे होणार असल्याची माहिती आंनद गुप्ता, पदाधिकारी, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दिली आहे. हा कॉरिडॉर ज्या परिसरातून जाईल, त्या परिसराच्या आजूबाजूचा 2 किमीचा परीसर आर्थिक केंद्र म्हणून विकसित होईल. तिथे औद्योगिक क्षेत्र विकसित होतील. एकूणच हा प्रकल्प महाराष्ट्राला सर्व दृष्टीने फायद्याचा ठरेल, असा दावा ही त्यांनी केला आहे.

हेही वाचा - भिवंडीमध्ये कुरियर गोदामाची इमारत कोसळली; नऊ ते दहा मजूर अडकल्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.