मुंबई : विकसित देश आणि विकसनशील देश यामध्ये मोठे अंतर आहे. विशेषतः विज्ञान तंत्रज्ञान आणि मानव विकासाबाबत आहे. बांबूवर काम करण्यासाठी जी साधने वापरली जातात त्यामध्ये देखील तंत्रज्ञानाच्या (Bamboo Technology) बाबतीत भारत अजूनही म्हणावा तितका पुढारलेला नाही. बांबू (Bamboo Processing) पर्यावरणासाठी पूरक आहे. मात्र तरीही प्लास्टिकच्या आणि इतर धातूच्या गिफ्ट आर्टिकल्स शोभेच्या वस्तू किंवा खुर्च्या घरातील अनेक सामान आपण बांबूने (Bamboo Products) बनवलेले घेत नाही. कारण बांबूला बाजारपेठीय मान्यता अद्यापही प्राप्त नाही. बांबूच्या कलात्मक वस्तूसाठी जे कारागीर काम करतात. त्यांच्या हातांना इजा देखील होतात. कामाची पद्धत सोपी कशी होईल त्यासाठी योग्य तंत्रज्ञान आणि यंत्र यांची गरज होती. आयआयटी मुंबईने (IIT Mumbai) बांबूच्या हस्तकलेसाठी महत्त्वाचे तंत्रज्ञान आणि यंत्र विकसित केले ते जाणून घेऊया.
तंत्रज्ञान विकासाची गरज : बांबू कापणे कोरीवकामा करिता पारंपरिक साधन वेळखाऊ होती. आता नवीन साधने तयार झाली आहेत. बांबूपासून तयार केलेल्या वास्तुमुळे पर्यावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. प्लास्टिक फायबर यासारख्या वस्तूंपासून ज्या कलात्मक वस्तू तयार होतात. त्यामुळे वातावरण प्रदूषित होते. ते पदार्थ विघटनशील नाहीत. बांबू मात्र विघटनशील आहे आणि बांबूपासून कार्बन डाय-ऑक्साइड काही तयार होत नाही. मात्र पारंपरिक रीतीने भारतामध्ये बांबूची शेती करणारे आणि बांबूपासून कलात्मक वस्तू बनवणारे लोक अद्यापही तंत्रज्ञानाच्या पातळीवर पुढारलेले नाहीत. म्हणून बांबूच्या वस्तूंना आणि त्या बाजारपेठेला फारशी मागणी नाही. मात्र आता बांबूची बाजारपेठ बांबूची शेती आणि त्यापासून तयार केलेल्या वस्तू यामध्ये तंत्रज्ञानाने भर घातलेली आहे. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट कार्यक्रम आणि आयआयटी संयुक्तरीत्या बांबूवर काम करण्यासाठी तंत्र विकसित केले आहे.
युएनडीपीचे तंत्र फायदेशीर : या संदर्भात युएनडीपी अर्थात युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्या वतीने मुंबई आयआयटीमध्ये इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर येथे बांबूवर कसे काम करायचे यासाठीचे तंत्र आणि यंत्र देखील विकसित केले गेले. विकसनशील देश त्यांच्या यादीत भारत आहे. भारतात दहा लाखपेक्षा अधिक व्यक्ती या बांबूच्या हस्तकलेवर अवलंबून आहे. हे सर्व व्यक्ती सामाजिक आणि आर्थिक वंचित या गटातील आहेत. त्यांची रोजची कमाई हे 30 रुपये 40 रुपये किंवा जास्तीत जास्त पन्नास रुपये असते. परंतु त्यांना जर छोटसे परंतु किफायतशिर तंत्र मिळाले; तर त्यांची रोजीरोटी वाढू शकते. याचा विचार करून आयआयटी मुंबईमधील इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर येथील बांबूवर कलाकुसर करण्यासाठी त्याला आकार देण्यासाठी टूल किट याची निर्मिती केली आहे. कोणताही शोध तंत्रज्ञान किंवा यंत्र हे जर मानवाच्या भल्यासाठी उपयुक्त ठरले नाही तर त्याच्या अस्तित्वाचा उपयोगच काय.
बांबूच्या छोट्या टूलकिटची निर्मिती : बांबूवर काम करण्यासाठी वापरली जाणारी पारंपरिक साधनांचा अभ्यास करून नवीन तंत्र व यंत्र शोधली. बांबू ज्या प्रदेशात तयार होतो आणि जिथे त्यावर कलाकुसर केली जाते. त्यामध्ये आसाम, मणिपुर, नागालँड आहे. इथे त्या त्या ठिकाणचा 'धुवा' या नावाचे हत्यार वापरला जाते. बांबूवर काम केले जाते. ही सर्व साधने माणसाने उत्क्रांत होत विकसित केलेले आहे .परंतु अधिक उच्च गुणवत्ता मिळवण्यासाठी कमी श्रम लागण्यासाठी नवीन प्रकारचे नवीन आकार असलेले तंत्र आणि यंत्र जरुरी आहे. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रकल्प आणि आयआयटी बॉम्बे यांनी संयुक्त पद्धतीने जगभरातील शंभर अशा वेगवेगळ्या बांबूवर काम केल्या जाणाऱ्या साधनांचा हत्यारांचा अभ्यास केला आणि अत्याधुनिक परंतु वापरायला साध्या सोप्या आणि छोट्याशा एका छोट्या बॅगमध्ये मावणार अशा टूलकिटची निर्मिती केली.
अत्याधुनिक साधनांचा समावेश : आयटी मधील इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर यांनी करवत, खर्चाटणी, पट्टी बनवणे मोजणी, मार्किंग,कापणे, तासणे इत्यादी क्रियांसाठी तसेच विणणे, बांधणी करणे अशा नवीन यंत्राची निर्मिती केली.गावात वापरल्या जाणाऱ्या परंतु अत्यंत उपयोगी नवीन तंत्राने छोटी यंत्र बनवली. पकडायला अत्यंत सोप्या अशा साधनांची निर्मिती केली. आणि यासाठी कोणत्याही प्रकारच्या विजेची गरज नाही .कोणीही न शिकलेला व्यक्ती ते चालवू शकेल .वापरू शकेल अशा रीतीने या सगळ्या टूलची निर्मिती केली. आणि हे टूलकिट्स एका बॅगमध्ये मावतील अशी बॅग देखील तयार केली.
चायनीज मॉडेलवर आधारित टूलकिट : चायनीज मॉडेलवर आधारित स्लिपटींग मशीन याची निर्मिती केली. सहजपणे ब्लेड फिक्सिंग यामध्ये केले जाते. बांबूला अत्यंत सुलभ पद्धतीने आकार देण्यासाठी याचा वापर केला जातो. दुसरे मशीन ज्याचं नाव आहे विड्थ साईझर मशीन .अत्यंत छोटा बांबू असेल परंतु बांबूची रुंदी नीट नेमकी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मार्किंग सुलभ करता यावे यासाठी याचा उपयोग होतो. तिसरं मशीन अत्यंत छोटसं. मात्र त्याचं नाव आहे थिकनेस मशीन. याने बांबूला योग्य जाडीमध्ये आकार देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतरच मशीन आहे आयडीसी साईझर. बांबूला हलकसं घासल्यानंतर पाहिजे त्या ठिकाणी त्याला गोलाकार अर्धगोलाकार आकार देऊन हाताने यावर सहज काम करता येतं . पूर्वी हे काम चाकु किंवा कोयताने केले जायचे.त्यामुळे हाताला इजा होत होती.आता नवीन यंत्रामुळे इजा टाळता येईल.याला विजेची गरज नाही. बांबूच्या लहान लहान पट्ट्या लहान लहान बास्केट इत्यादी काम करण्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो. सर्वात महत्त्वाचे आहे बांबूच्या वस्तू बनवण्यासाठी जे साचे जे जिक्स आणि फिक्सर लागतं. त्यासाठी महत्त्वाचं असं छोटसं यंत्र हे बास्केटचे आकारासारखे आहे.ते देखील।बनवलं आहे. आणि यामध्ये लाकडी साचे प्लास्टिकचे साचे जसे मोल्ड केले जातात तसेच किंवा स्लिप्ट मोड बांबूच्या वस्तू तयार करताना देखील याचा उपयोग होतो.
भारतीय तंत्रज्ञानाचा वापर फिफा वल्ड कपमध्ये : भारताच्या तंत्रज्ञानाचा वापर करून फिफा वर्ल्ड कप कतार येथे हॉटेलला डिझाईन करण्याचे काम महाराष्ट्रीयन लोकांनी केले. या यंत्राचा वापर ज्यांनी स्वतः केला आणि इतर ग्रामीण महिलांना देखील करायला शिकवले त्यांचं नाव संजीव करपे जे स्वतः इंजिनियर आहेत .त्यांनी ई टीव्ही सोबत बातचीत करताना सांगितले," की आयटी मुंबईने अत्यंत छोटी छोटी पण मोलाची साधने तयार केली. जुन्या हत्यारांचा आधी अभ्यास केला आणि त्याच्या आधारे नवीन आकाराची छोटीशी साधन तयार झाली. ज्यामध्ये विजेचा वापर न करता खेड्यापाड्यात सहज या साधनांचा वापर करता येतो. ज्यामुळे काम सुलभ आणि नीटनेटके होते. फिफा वर्ल्ड कप साठी आत्ता आम्ही काही महिन्यांपूर्वी तिथे गेलो होतो आणि सगळे खेळाडू ज्या मुख्य सभागृहामध्ये थांबणार होते तिथल्या छतासाठी ,तिथल्या सुशोभित वस्तूंसाठी आम्ही महत्त्वाचे काम केले. आणि ज्यामुळे बांबूचा परिणामकारक उपयोग होतो हे देशाबाहेरही खेळाडूंना समजले. आता कतार देशात 'फिफा' या फुटबॉलच्या जागतिक स्पर्धेसाठी सर्व खेळाडू एकत्र जमलं होते. तेथे मोठे सभागृह होते त्या सहभागृहामध्ये शोभिवंत वस्तू आणि छताच्या डिझाईनचे काम कोकणामधील महाराष्ट्रीयन माणसांनी केले.त्यात ह्याच छोट्याशा साधनांचा प्रचंड उपयोग झाला."
बॅगमध्ये मावनारे टूलकिट विकसित : यासंदर्भात आयआयटी मधील ही साधने शोधून काढणारे त्याला नवीन डिझाईन प्राप्त करणारे आणि अल्प स्वरूपाचे बिगर विजेवर चालणारे साधन निर्माण करणारे संशोधक ए जी राव यांनी सांगितले की," मानवाने आपल्या परीने शेतीचे काम करण्यासाठी हत्यार विकसित केली. त्याच रीतीने बांबूवर काम करण्यासाठी देखील हत्यार साधन विकसित केली. मात्र देशभरातील दुर्गम गावांपर्यंत नवीन साधन पोहोचायला पाहिजे. जी माणसाला वापरायला सुलभ आहे सोपी आहे. जास्त खर्चिक नाही. त्याला वीज लागत नाही. म्हणून यावर यूएनडीपी आणि आयआयटी मुंबई यांनी प्रकल्प राबवला आणि जवळजवळ 30 ते 35 अशी छोटीशी साधना तयार झाली. हे टूलकिट एका बॅगमध्ये मावतील; अशा रीतीने तयार केली गेली. ज्यामुळे कोणत्याही त्या गावातील कारागिराला कुठेही बॅग उचलली की सहज सर्व साधनं उचलून नेता येऊ शकतात. बांबू हे शाश्वत उद्योगात त्याच्या विकासात भर घालणारे महत्त्वाचे बाब आहे. शाश्वत विकास ज्याला संयुक्त राष्ट्रसंघ इंग्रजीमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट SDG म्हणतो ते बांबूच्या उद्योगांमध्ये सहज साध्य होतं. तंत्रज्ञानाचा फायदा जनसामान्यांना होत असल्यास त्याचं स्वागत जनता नक्की करेल.