ETV Bharat / state

आयपीएल प्रकरणी याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयाने फटकारले

यावर्षीची आयपीएल स्पर्धा युएईमध्ये खेळवली जाणार आहे. यामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने या विरोधात पुण्यातील वकील अ‌ॅड. अभिषेक लागू यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल केली आहे.

High Court
उच्च न्यायालय
author img

By

Published : Aug 18, 2020, 2:48 PM IST

मुंबई - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत युएईतील शारजाहा, अबुधाबी व दुबई येथे खेळवली जाणार आहे. यामुळे देशाचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याने या विरोधात पुण्यातील वकील अ‌ॅड. अभिषेक लागू यांनी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश दीपंकर दत्ता व न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांला चांगले धारेवर धरले आहे.

या याचिकेवर जर तातडीची सुनावणी घ्यायची असेल, तर आगोदर न्यायालयाने सांगितलेली अनामत रक्कम जमा करा. ही रक्कम काही कोटींमध्ये असणार असून याचिकेचा निर्णय जर याचिकाकर्त्यांच्या विरोधात लागला तर ही अनामत रक्कम गोर गरिबांसाठी खर्च करण्याचे आदेश देण्यात येतील, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायायालयाने सुनावले आहेत.

पुण्यातील वकील अभिषेक लागू यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना म्हटले, की आयपीएल हा बीसीसीआयच्या उत्त्पनाचा मुख्य स्रोत असून यामुळे राज्य व केंद्रालाही मोठा महसूल मिळत आहे. कोरोनामुळे देशाची आर्थिक परिस्थिती कोलमडलेली आहे. त्यामुळे योग्य नियोजन व नियाम लागू करून आयपीएल भारतातच भरवण्यात यावे, अशी मागणी लागू यांनी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.