ETV Bharat / state

मुंबई उच्च न्यायालयातील अभिनेता सूदच्या याचिकेवरील निर्णय राखीव

author img

By

Published : Jan 13, 2021, 6:33 PM IST

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या शक्ती सागर या 6 मजली इमारतीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मुंबई महापालिकेने कारवाई केल्यानंतर याबाबत सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. बुधवारी (दि. 13 जाने.) न्यायाधिशांनी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून याचिकेवरील नर्णय राखून ठेवला आहे.

सोनू सूद
सोनू सूद

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या जुहू परिसरातील शक्ती सागर या 6 मजली इमारतीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मुंबई महापालिकेने कारवाई केल्यानंतर यासंदर्भात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर याची सुनावणी झाली असता दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखून ठेवलेला आहे.

काय झाले दावे..?

अभिनेता सोनू सूद हा सवयीचा अपराधी म्हणजेच हॅबिच्युअल ऑफेंडर असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून आरोप करण्यात आलेला आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या मुंबईतील शक्ती सागर या मालकीच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेकडून कारवाई केल्यानंतर याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सूदने याचिका दाखल केली होती. मुंबई महानगरपालिकेने माझ्यावर केलेली कारवाई ही भेदभाव असून 1992 साली बांधण्यात आलेल्या शक्ती सागर ही सहा मजली इमारत मी 2018 मध्ये आहे त्या परिस्थितीत घेतली होती. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केले नसल्याचा दावा सोनू सूदने बुधवारी (दि. 13 जाने.) झालेल्या सुनावणीत केला आहे.

दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी या याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे.

हेही वाचा - सोनू सूद सवयीचा अपराधी, बीएमसीचा उच्च न्यायालयात आरोप

हेही वाचा - बीएमसीची कारवाई, सोनू सूद पवारांच्या दारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.