मुंबई: फिर्यादी प्रेयसी मुलीचे म्हणणे होते की, सार्वजनिक ठिकाणे आपल्या प्रियकराने आपल्याला मारहाण केली. त्यामुळे त्याला शिक्षा झाली पाहिजे. मात्र उपलब्ध पुरावे आणि फिर्यादीचा कबुली जबाब पाहता मुंबई उच्च न्यायालयाने आपले मत सांगितले की, जी पीडित मुलगी आहे तिची उलट तपासणी केली गेली. त्या उलट तपासणीमध्ये हे आढळून आले की आरोपी प्रियकर आणि प्रेयसी फिर्यादी हे दोघे एकमेकांना ओळखत होते. त्यांचे प्रेम संबंध होते. ते नेहमीच एकमेकांना भेटत होते.
मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल: मात्र फिर्यादी मुलगी ही अल्पवयीन आहे. तिला सार्वजनिक ठिकाणी जाणून-बुजून मारहाण केली, अशा रीतीने मुलीने तक्रार केली होती. पोस्को न्यायालयाच्या मुंबईतील विशेष न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली होती. परंतु शिक्षेचा कालावधी सहा महिन्यापेक्षा कमी होता. दरम्यान आरोपी प्रियकराने पोस्को न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
दोन्ही गुन्ह्यांसाठी दोषी मानले: मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर न्यायमूर्ती भारतीय डांगरे यांच्या खंडपीठांसमोर 22 नोव्हेंबर 2022 रोजी आरोपी प्रियकराने त्याला ठोठावलेल्या पोस्को न्यायालयाच्या शिक्षेच्या विरोधात आव्हान दिले होते. त्याला भारतीय दंडविधान कलम 354 महिलांचा अपमान करणे आणि विनयशीलतीचा भंग करणे तसेच लैंगिक छळ करणे 354 असे दोन्ही गुन्ह्यांसाठी दोषी मानले गेले होते.
पुरावे समोर आणण्यात अयशस्वी: उच्च न्यायालयाने यासंदर्भात आपले निरीक्षण नोंदवले की, त्या प्रियकरावर जो काही आरोप लावण्यात आलेले आहे. त्याच्या आरोपातून त्याला मुक्त करताना हे नमूद करावे असे वाटते की, कोणत्याही स्त्रीचे तिच्या सन्मानाचे रक्षण कोणत्याही स्थितीत झाले पाहिजे. परंतु संशय येण्यापलीकडे या खटल्यामधून काहीही पुरावे उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळे पुरावे समोर आणण्यात फिर्यादी यामध्ये अयशस्वी ठरली आहे.
नातेसंबंधाला नकार दिल्यामुळे मारले: जेव्हा घटना घडली तेव्हा तो प्रियकर मुलगा 22 वर्षाचा आणि ती सतरा वर्षाची होती. ती त्याच परिसरात राहत होती. की ज्या परिसरामध्ये तो मुलगा देखील राहत होता. परंतु जेव्हा त्या मुलीला समजले की, तो एक वर्ष तुरुंगात होता. म्हणून ती त्याला नकार देऊ लागली. त्याला टाळू लागली आणि आपले नातेसंबंध संपवू लागली. त्यानंतर मग तो तिला मोबाईलद्वारे टेक्स्ट मेसेज पाठवू लागला. जेव्हा त्यांची भेट झाली. त्यावेळेला त्याने तू का टाळत आहे,असे तिला विचारले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यामुळे त्याने तिला चापट मारली आणि गळ्याला धरला. तिने नातेसंबंधालाच नकार दिल्यामुळे तिच्या मित्राच्या हजेरीतच प्रियकराने तिच्यावर अत्याचार केला, असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.
कोणताही पुरावा सादर नाही: प्रियकर आरोपीचे वकील सुनील पांडे यांनी उच्च न्यायालयासमोर बाजू मांडली की, आरोपीच्या बाबत कोणताही प्रत्यक्ष पुरावा सादर केला नाही. त्याच्यामुळे ज्या मुलीने तक्रार केलेली आहे, तिच्याकडून कोणताही पुरावा याबाबत सादर झाला नाही. तसेच तिने याबाबत उलट तपासणीला देखील विरोध केला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे विशेष न्यायाधीश प्रीती कुमार घुले यांनी म्हटले की, आरोपीचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी कोणताही ठोस पुरावा फिर्यादीकडून उपलब्ध केला गेला नाही. त्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. तसेच पोस्को न्यायालयाने नोंदवलेला गुन्हा सिद्ध न झाल्याने रद्द केला जात आहे.
हेही वाचा: Mumbai Crime अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविणाऱ्या आणि लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक