ETV Bharat / state

मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली - मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली

दक्षिण मुंबईतील जुम्मा मशीद ट्रस्टच्यावतीने एकावेळी 50 जणांना मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी देण्यासाठी याचिका दाखल केली होती. राज्यातील कोरोना स्थिती फार बिकट असून या काळात लोकांना एकत्र जमवणे योग्य ठरणार नाही. कोविडने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे आणि लोकांची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Apr 14, 2021, 5:27 PM IST

मुंबई - मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली आहे. दक्षिण मुंबईतील जुम्मा मशीद ट्रस्टच्यावतीने एकावेळी 50 जणांना मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी देण्यासाठी याचिका दाखल केली होती. राज्यातील कोरोना स्थिती फार बिकट असून या काळात लोकांना एकत्र जमवणे योग्य ठरणार नाही. कोविडने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे आणि लोकांची सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

हेही वाचा - 'उसेन बोल्ट'लाही मागे टाकतात कर्नाटकचे श्रीनिवास गौडा!

पवित्र रमजाननिमित्त पाच वेळा मर्यादित लोकांना मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी द्यावी, अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. परंतु, परवानगी देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायमूर्ती आरडी धानुका आणि न्यायमूर्ती व्ही.जी. बिष्ट यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला निर्बंध लावावे लागत आहेत. धार्मिक प्रथा साजरे करणे किंवा त्यांचे पालन करणे महत्त्वाचे आहे, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था आणि लोकांची सुरक्षा, असल्याचे न्यायालयाने सांगितले.

हेही वाचा - आज संध्याकाळपासून महाराष्ट्रात 144 कलम लागू, वाचा सविस्तर, काय सुरू काय बंद...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.