ETV Bharat / state

AutoRickshaw Driver Burnt Police Constable : पोलीस कॉन्स्टेबलला जिवंत जाळल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा कायम - पोलीस कॉन्स्टेबलला जिवंत जाळल्या प्रकरण जन्मठेपेची शिक्षा

वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने ( Traffic Police Constable Mumbai ) ऑटोरिक्षा चालकाला नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोव्हेंबर 2010 मध्ये चलान जारी केले होते. या प्रकरणात रिक्षाचालकाने मनात राग धरत पोलीस कॉन्स्टेबलला जिवंत पेट्रोल टाकून जाळले. ( Auto Driver Burnt Traffic Police Constable ) याप्रकरणी ट्रायल कोर्टाने रिक्षा चालकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ( Trial Court Given Imprisonment )

mumbai high court
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Mar 23, 2022, 7:28 PM IST

मुंबई - वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलने ( Traffic Police Constable Mumbai ) ऑटोरिक्षा चालकाला नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोव्हेंबर 2010 मध्ये चलान जारी केले होते. या प्रकरणात रिक्षाचालकाने मनात राग धरत पोलीस कॉन्स्टेबलला जिवंत पेट्रोल टाकून जाळले. ( Auto Driver Burnt Traffic Police Constable ) याप्रकरणी ट्रायल कोर्टाने रिक्षा चालकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ( Trial Court Given Imprisonment ) या शिक्षेविरोधात रिक्षा चालकाने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाने रिक्षाचालकाचा दयेचा अर्ज आज फेटाळून लावला असून ट्रायल कोर्टाने सुनावलेली शिक्षा ही कायम ठेवली आहे. ( Mumbai High Court Continue Trial Court Decesion )

न्यायमूर्तींनी फेटाळले अपील - मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2010 मध्ये एका वाहतूक पोलिस कॉन्स्टेबलच्या हत्येप्रकरणी ऑटो-रिक्षा चालकाला ठोठावण्यात आलेली दोषी आणि जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. कॉन्स्टेबल अनिल ऐतेवडेकर यांनी कुमार केवटे या रिक्षा चालकाला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चलान जारी केले होते. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एस. व्ही. कोतवाल यांच्या खंडपीठाने दोषी महेंद्र कुमार केवटने दाखल केलेले अपील फेटाळून लावले. ऑक्टोबर 2012च्या ट्रायल कोर्टच्या आदेशाला कुमार केवटने आव्हान दिले होते.

हेही वाचा - Government's Reply : फौजदारी कायद्यातील सुधारणांची प्रक्रिया सुरू: गृह मंत्रालय

घटनेनंतर तीन दिवसात मृत्यू - घटनेच्या दिवशी रिक्षा चालकाकडे कॉन्स्टेबलने त्याचा परवाना आणि इतर कागदपत्रे मागितली होती. आरोपीने त्याच्याकडे संबंधित कागदपत्रे नसल्याचे उघड केल्यावर, कॉन्स्टेबलने त्याचा परवाना जप्त केला आणि त्याला चलान दिले. त्यानंतर रिक्षा चालक निघून गेला. मात्र, काही वेळाने परत आला आणि त्याने कॉन्स्टेबलवर पेट्रोल ओतले आणि त्याच्यावर पेट्रोल टाकलेला शर्ट फेकला आणि नंतर त्याला पेटवून दिले. कॉन्स्टेबलला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तीन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. पुरेसे पुरावे बघता आणि प्रत्यक्षदर्शी यांच्या जबाब पाहता रिक्षा चालकाला दोषी ठरवण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.