मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फर्सींगद्वारे मुंबई-गोवासह पाच वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. कोकण रेल्वेवर मान्सून वेळापत्रक लागू झाल्यामुळे वंदे भारतच्या वेगावर मर्यादा येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई-गोवा वंदे भारत ही बहुप्रतिक्षीत रेल्वे गाडी ३ जूनपासून सुरू होणार होती. मडगाव रेल्वे स्थानकातून लोकार्पण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह रेल्वे बोर्डाचे वरीष्ठ अधिकारी उद्घाटनासाठी गोव्यात दाखल झाले होते. मात्र २ जूनला ओडीशातील बालासोर इथे तrन रेल्वे गाड्यांचा भिषण अपघात झाला. यामध्ये २८८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर हजारापेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. या अपघाताचे वृत्त ऐकताच रेल्वेमंत्री गोवा विमानतळावरुन माघारी निघाले. हा उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलला गेला होता.
- मान्सूनचे अडथळे: कोकण रेल्वेवर मान्सून वेळापत्रक लागू झाले असून या अंतर्गत सर्वच रेल्वेगाड्यांच्या वेगावर मर्यादा आल्या आहेत. या शिवाय पावसाळ्यात कोकण रेल्वेवर दरडी कोसळण्याचा घटना सुरु असते. या शिवाय दृष्यमानताही कमी होते.अशा परिस्थितीत वंदे भारत या सेमी स्पीड रेल्वेगाडीला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे. मुंबई-गोवा ही शुक्रवारी गाडी प्रवाशांच्या सेवेत नसेल.
मुंबई- गोवा 'वंदे भारत'चे वैशिष्टे - एकूण आठ डब्ब्याची गाडी असणार
- आठवड्यातून सहा दिवस धावणार
- वेग क्षमता- १६० किलोमीटर प्रति तास
- मान्सून वेळापत्रकामुळे वेगावर मर्यादा
- प्रत्यक्षातील वेग ८० किलोमीटर प्रति तासच्या आतमध्ये
- तिकिटीच्या किंमतीत नाष्टा,जेवण
- डगाव ते सीएसएमटी प्रवास ७ तासात पुर्ण करणार
अशा असणार सुविधा - संपूर्ण डबे वातानुकिलत असणार
- जीपीएसआधारित ऑडिओ व्हिज्यूअल माहिती प्रणाली
- स्वयंचलित खिडक्या आणि दरवाजे
- अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे
- प्रत्येक डब्यात इमरजेंसी पुश बट
- वैक्युम आधारित टायलेट
- १८० डिग्री फिरणारी आसने
अंदाजित तिकीट दर - चेअर कार- १५८० रुपये
- एक्झिक्युटीव चेअर कार- २८७० रुपये
'वंदे भारत'चे थांबे - सीएसएमटी सुरु होणार
- दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली,थिविम
- मडगाव शेवटचे सुरुवात
या पाच 'वंदे भारत'चे लोकार्पण - मुंबई-गोवा
- बंगलुरु-हुबली
- पटना-रांची
- भोपाळ -इंदूर
- भोपाळ-जबलपूर
हेही वाचा-