ETV Bharat / state

Mumbai Goa Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्याऐवजी फक्त्त ८ डब्याची चालणार, 'या' तारखेला होणार मान्सून वेळापत्रक लागू - Prime Minister Narendra Modi

कोकणवासीयांसाठी चालविण्यात येणारी मुंबई- गोवा वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्याऐवजी फक्त्त ८ डब्याची चालणार आहे. वंदे भारत सुरु झाल्यानंतर आठवडाभरात कोकण रेल्वे मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामुळे कोकणात पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा 'वंदे भारत'च्या गतीवर आणि वक्तशिरपणावर मोठा परिणाम पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा वंदे भारतची कसोटी घेणारा ठरेल असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

Vande Bharat
वंदे भारत
author img

By

Published : Jun 5, 2023, 10:39 PM IST

मुंबई : देशभरातील जवळपास सर्वच 'वंदे भारत' ट्रेनच्या वेगाच्या क्षमतेपेक्षा कमी म्हणजेच सरासरी ताशी ९०-९५ किलोमीटर वेगाने चालवली जाते. त्यामुळे अनेक प्रवाशांनी महागड्या वंदे भारत ट्रेनकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. पंतप्रधानांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झालेल्या नागपूर- बिलासपूर 'वंदे भारत' ट्रेनला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या या ट्रेनच्या सोळा डब्बापैकी आठ डब्बे कमी करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर आली आहे.

ट्रेनला १६ ऐवजी केवळ ८ डब्बे असणार: कोकणात ३ जूनला या गाडीचे लोकार्पण होणार होते. या वंदे भारत ट्रेनला १६ ऐवजी केवळ ८ डब्बे असणार आहेत. याशिवाय पावसाळा तोंडावर आला आहे. 'वंदे भारत'सुरु झाल्यावर त्याची गती सरासरी ७४. ८४ किलोमीटर प्रति तास एवढी असणार आहे. त्यामुळे गाडी सुरु होण्यापुर्वीच वेग कमी असल्यामुळे चाकरमान्यांमध्ये निराशा पसरली आहे. कारण सध्या मुंबई- मडगाव तेजस एक्सप्रेसचा वेग ६६ ते ६७ किलोमीटर प्रति तास एवढा आहे. जर प्रवासाच्या वेळेत बचत होणार नसेल तर वंदे भारत ट्रेनचे महागडे तिकीट घेवून काय फायदा असा साधा विचार कोकणवासीयांचा आहे.

मान्सूनमध्ये काय होणार ?: दरवर्षी पावसाळ्यात रेल्वेकडून मान्सून वेळापत्रक जारी केले जाते. कोकणात मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याची भीती असल्याने प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वच मेल- एक्सप्रेस गाड्यांचा वेगावर मर्यादा येते. यंदा मुंबई ते गोवा धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसात अर्थात १० जून पासून कोकण रेल्वे मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू होणार आहे. त्यामुळे पावसाळयात वंदे भारत ट्रेन कोणत्या गतीने धावणार याकडे प्रवाशासोबत रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

वंदे भारतला लोकार्पणाची प्रतीक्षा: मडगाव ते मुंबई या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचे शनिवारी 3 जून रोजी लोकार्पण करण्यात येणार होते. इतर भागात ज्याप्रमाणे वंदे भारत एक्सप्रेसच्या गाड्यांचे ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्याचं प्रमाणे या मार्गावरील वंदे भारतचे देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हातून होणार होते. मात्र, या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार होते. शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस ही ट्रेन धावणार आहे. सीएसएमटी स्थानकातून पहाटे 5 वाजून 25 मिनिटांनी निघालेली ही गाडी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मडगावला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासासाठी मडगांवहुन दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी निघालेली ट्रेन रात्री १० वाजून २५ मिनिटांनी सीएसएमटीला पोहचणार आहे. ५८६ किलोमीटरचे अंतर हि गाडी ८ तासात पार करणार आहे.

Vande Bharat News
गाड्यांचा सरासरी वेग

कोकणात धावणाऱ्या गाड्यांचा सरासरी वेग: २२११९ मुंबई मडगाव तेजस एक्स्प्रेस - ताशी ६६ किमी, २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस - ताशी ६७ किमी, १२०५१ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस - ताशी ६५ किमी, १२०५२ मडगाव मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस - ताशी ६६ किमी, २०१११ मुंबई मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस - ताशी ५५ किमी, २०११२ मडगाव मुंबई कोकणकन्या एक्सप्रेस - ताशी ५५ किमी, मडगांव - सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस ताशी ७४.८४ किमी वेग असणार आहे.

Vande Bharat News
वंदे भारत आणि इतर गाड्यांचा प्रवास वेळ

वंदे भारत आणि इतर गाड्यांचा प्रवास वेळ: मुंबई मडगाव वंदे भारत ट्रेन- ७ तास ५० मिनिट लागणार आहे. मुंबई मडगाव तेजस एक्स्प्रेस- ८ तास ६ मिनिट वेळ लागणार आहे. मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस ८ तास ७ मिनिट इतका वेळ लागणार आहे. तर मुंबई मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस ८ तास ५० मिनिटे लागणार आहे.

हेही वाचा -

  1. Vande Bharat Train मडगावमुंबई वंदे भारत ट्रेन लोकार्पणापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात काय आहे वाद
  2. Vande Bharat Train मुंबई ते गोवा दरम्यान धावणार राज्यातील पाचवी वंदे भारत ट्रेन जाणून घ्या सविस्तर
  3. Vande Bharat Express मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण काही तासांवर रेल्वे कर्मचारी देत आहेत फायनल टच

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.