ETV Bharat / state

Mumbai Girl Rape Case : आठ वर्षांच्या चिमुकलीवर 53 वर्षाच्या नराधमाचा अत्याचार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या - मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

Mumbai Girl Rape Case : मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एका आठ वर्षीय चिमुकलीवर एका 53 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्यानं खळबळ उडाली. या नराधमाला मेघवाडी पोलिसांनी अटक केली असून त्याला दिंडोशी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी ठोठावल्याची माहिती मेघवाडी पोलिसांनी दिली आहे.

Mumbai Girl Rape Case
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 27, 2023, 2:02 PM IST

मुंबई Mumbai Girl Rape Case : एका आठ वर्षाच्या चिमुकलीवर एका 53 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्यानं खळबळ उडाली. ही घटना मुंबईतील जोगोश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी लैंगिक अत्याचार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण कायदा २०१२ च्या विविध कलमानुसार मेघवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा ( Mumbai Rape ) दाखल केला आहे. मेघवाडी पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  • 8-year-old girl allegedly raped in Mumbai’s Jogeshwari area. The accused is a 53-year-old man. The accused and the victim lived in the same building and the girl’s mother used to leave the child at the accused’s home while going to work as there was nobody at home to take care of…

    — ANI (@ANI) September 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आठ वर्षाच्या चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार : पीडित चिमुकलीची आई ही जोगेश्वरीतील एका परिसरात राहते. यातील नराधम हा पीडित चिमुकलीच्या वरच्या माळ्यावर राहते, तर चिमुकलीचं कुटुंब खालच्या तळमजल्यावर राहते. त्यामुळे दोन्ही कुटुंबं एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे आहेत. मुलीची आई कामानिमित्त बाहेर जात असल्यानं तिनं तिच्या मुलीची जबाबदारी पोट माळ्यावर राहणाऱ्या आरोपीच्या कुटुंबीयांकडं सोपविली होती. अनेकदा आई मुलीला आरोपीच्या घरी सोडून कामावर जात होती. रविवारी या चिमुकलीनं तिच्या आईला आरोपी तिच्याशी अश्‍लिल चाळे करत असल्याचं सांगितलं होतं. ही माहिती ऐकून पीडितेच्या आईला तिला धक्काच बसला. त्यामुळे तिनं मेघवाडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती.

उपचारासाठी पीडितेला केलं रुग्णालयात दाखल : आठ वर्षीय चिमुकलीवर 53 वर्षाच्या नराधमानं अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात या नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडितेला पोलिसांनी केईएम रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांकडून नराधमाचीही वैद्यकीय चाचणी होणार आहे. पोलिसांनी या नराधमाला अटक करुन न्यायालयात हजर केलं, यावेळी विशेष सत्र न्यायालयानं या नराधमाला पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती मेघवाडी पोलिसांनी दिली आहे.

नराधमाविरोधात पोक्सोनुसार गुन्हा : आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यामुळे नराधमाला पोलिसांनी अटक करुन दिंडोशी न्यायालयात हजर केलं. पोलिसांनी या नराधमाविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचं संरक्षण कायदा २०१२ च्या ( POCSO ) विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या नराधमाला पोलिसांनी दिंडोशी न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा गुन्हा 7 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या दरम्यान घडल्याची माहिती मेघवाडी पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास सुरु असल्याची माहितीही मेघवाडी पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Model Rape Case Mumbai : महिला मॉडेलसोबत 'एनआरआय' मॉडेलचा लव-सेक्स-धोका; अत्याचाराचा अतिरेक अन् पोलिसात तक्रार
  2. Little Girl Rape Case : चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, नराधमाला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी वापरली 'ही' युक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.