मुंबई : वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ठिकठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात आले. सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात असलेले कर्मचारी रस्त्यावर तैनात असलेल्या पोलिसांना माहिती देत राहतील. गेल्या काही महिन्यांत मुंबई पोलिसांना ६० हून अधिक संशयास्पद कॉल्स आले असून त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात येणार आहे.
वाहतूक विभागाने गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मार्वे, पवई आदी विसर्जन स्थळांभोवती एनजीओ होमगार्डचीही मदत घेतली आहे. केवळ भाजीपाला, दूध, बेकरी उत्पादने, पिण्याच्या पाण्याचे टँकर, पेट्रोल, डिझेल, रॉकेलचे टँकर, स्कूल बस, रुग्णवाहिका, सरकारी आणि निमशासकीय वाहनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. कुलाबा वाहतूक विभागाने नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, पांडे मार्गावर आवश्यक नसल्यास वाहन चालवणं टाळा असा सल्ला दिला आहे.
- आझाद मैदान वाहतूक विभाग महानगरपालिका सीएसटी जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौकापर्यंत संचारबंदी राहील. काळबादेवी वाहतूक विभाग : जेएसएस रोड, विठ्ठल भाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, राजाराम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टँक रोड, संत सेना मार्ग, नानू भाई देसाई रोड, सरदार वल्लभ भाई पटेल मार्ग याकडे जाणे टाळा.
- येथे पार्किंगवर बंदी असेल : जेएसएस रोड, व्ही पी रोड, सीपी टँक ते नित्यानंद हॉटेल, बाबा साहेब जयकर मार्ग, राजाराम मोहन रोड, गुलाल वाडी जंक्शन ते सीपी टँक, मौलाना शौकत अली ते नानुभाई देसाई रोड, गोल देवल ते प्रार्थना समाज या मार्गावर कोणतेही वाहन उभे करता येणार नाही. याशिवाय पायधुनी विभागातील रामचंद्र भट्ट मार्ग, शिवदास चापसी मार्ग, सामंत भाई नानजी मार्ग, डॉ.मेशेरी रोड, मौलाना आझाद रोड, मौलाना शौकत अली रोडवर नो पार्किंग असणार आहे.
- लालबागचा राजा : गरज नसल्यास हिंदमाता जंक्शन, भारत माता जंक्शन, परळ टी टी जंक्शन, रणजित बुधकर चौक, आग्रीपाडा, नागपाडा, सात रस्ता जंक्शन, खडा पारसी जंक्शन, एनएम जोशी मार्ग, चिंचपोकळी जंक्शन, मुंबई सेंट्रल जंक्शन या ठिकाणी वाहन घेऊन न येण्याचा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे. वाहनांमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो.
- एकेरी मार्ग : आवश्यकतेनुसार वरळी नाका जंक्शन बंद करून हाजी अलीकडे जाणारी वाहने डॉ ई मोसेस रोडवरून वळविली जाऊ शकतात. लालबागचा राजा बाबासाहेब आंबेडकर रोड उत्तरेकडून भारत माता जंक्शनच्या दिशेने बाप्पाच्या स्वारीचे आगमन होण्यापूर्वी शिंगटे मास्तर चौकातून भारत माता जंक्शनकडे जाणारी वाहने तात्पुरती बंद ठेवली जातील. चिंचपोकळी जंक्शनजवळून लालबागचा राजा पास झाल्यानंतर शिंगटे मास्तर चौकातून दक्षिणेकडे जाणारी वाहने तात्पुरती थांबवली जातील. चिंचपोकळी जुन्या पुलावर 100 पेक्षा जास्त लोक गणपती बाप्पासोबत जाऊ शकत नाहीत.या पुलांवर नाच-गाणे करता येणार नाही.
हेही वाचा-