मुंबई - भायखळ्यातील माजगावच्या मुस्तफा बाजार येथील संत सावता मार्गावरील लाकूडफाटातील दुकानांना मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात आली. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, साहित्य जळून खाक झाले आहे.
आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाचे ८ वाहने तसेच १२ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आग विझवण्यात आली. तब्बल ६ तासांच्या प्रयत्नानंतर भायखळ्यातील आग विझवण्यात आली. यामध्ये लाकुडफाटा परिसरातील साधारण 8 ते 10 दुकान जळाली आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. याबाबत अधिक माहिती पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.