ETV Bharat / state

Mumbai Fire Brigade: अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली चार आयएसओ नामांकने - चार आयएसओ नामांकने

मुंबई अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade) भायखळा येथील नियंत्रण कक्षाला (mumbai fire control room) चार आयएसओ मानांकने (ISO nominations) प्राप्त झाली आहेत. ही सर्व आयएसओ मानांकने अमेरिका मान्यता प्राप्त आहेत.

mumbai fire control room
भायखळा येथील नियंत्रण कक्ष
author img

By

Published : Oct 31, 2022, 10:57 PM IST

मुंबई: देशभरात मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचा लौकिक आहे. या अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade) भायखळा येथील नियंत्रण कक्षाला (mumbai fire control room) चार आयएसओ मानांकने (ISO nominations) प्राप्त झाली आहेत. ही सर्व आयएसओ मानांकने अमेरिका मान्यता प्राप्त आहेत. पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी अग्निशमन दलाचे अभिनंदन केले आहे.

पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे
पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे

आयएसओ नामांकने: मुंबई अग्निशमन दलाचे ३५ अग्निशमन केंद्रे असून १९ लघु अग्निशमन केंद्रे आहेत. अग्निशमन दलाचे मुख्यालय भायखळा येथे असून येथे मुख्य नियंत्रण कक्ष आहे. प्रत्येक अग्निशमन केंद्रात उप नियंत्रण कक्ष आहेत. अद्ययावत नियंत्रण कक्षाला आयएसओ मानांकन प्राप्त होण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून भायखळा येथील मुख्य नियंत्रण कक्षात काम सुरू होते. प्रथम आयएसओच्या गाईडलाईननुसार, मुख्य नियंत्रण कक्षाचे ऑडिट करण्यात आले. याकरिता आयएसओचे दोन ऑडीटर सोबत काम करावे लागले. त्यांनी सूचित केलेल्या आयएसओच्या गाईडलाईन नुसार अवघ्या तीन महिन्यांत विशेष बदल करत मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला चार आयएसओ नामांकनाने प्राप्त झाली आहेत. आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी विभागीय अग्निशमन अधिकारी रमेश डी. भोर यांनी सिहांचा वाटा उचलला आणि तेच या आयएसओ प्रोजेक्टचे हेड होते.

नियंत्रण कक्ष गुणवत्तेमध्ये वृद्धी: मुंबई अग्निशमन केंद्राच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दर्जेदार व्यवस्थापन प्रणाली करिता आयएसओ मानांकन 9001:2015, तर आयएसओ मानांकन 14001: 2015 हे पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली करिता आणि आरोग्य आणि सुरक्षितता व्यवस्थापन प्रणाली करिता आयएसओ मानांकन 45001:2018 प्राप्त झाले आहे. चौथे आयएसओ/आइसी कमिटी मानांकन 27001:2013 हे माहिती सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली करिता प्राप्त झाले आहे. ही सर्व आयएसओ मानांकने अमेरिका मान्यता प्राप्त आहेत. या आयएसओ नामांकनामुळे नियंत्रण कक्षाची सेवा गुणवत्तेमध्ये वृद्धी होऊन ते प्रभावीपणे कार्यक्षम होण्यास चालना मिळेल. याचबरोबर आवश्यक कायदेशीर बाबींचे पालन होण्यास मदत होईल. कोणत्याही प्रकारे बाहेरून व्हायरस या मुख्य नियंत्रण कक्षातील सर्वर मध्ये येऊ शकत नाही. यासोबतच संगणकीय प्रणाली मधील दुर्बलता आणि संभाव्य धोके ओळखून त्यावर मात करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. आणीबाणीच्या परिस्थितीतही नियंत्रण कक्ष २४ तास सुरू राहणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.