मुंबई - प्रचाराला शेवटचे काही तास शिल्लक असल्याने शुक्रवारी अखेरच्या दिवशी काँग्रेस महाआघाडीचे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी मतदारसंघात जाहीर सभांचा धडाका लावला.
सकाळी सायन कोळीवाडा परिसरातील अरोरा सिनेमा, जैन सोसायटी परिसरात त्यांनी रोड शो केला. त्यानंतर दिवसभरात त्यांनी एकूण १७ जाहीर सभांना संबोधित केले. दिवसभरात एवढ्या सभा घेतल्याने त्यांचा प्रचाराच धडाका दिसून आला. वडाळा, सायन कोळीवाडा, अणुशक्ती नगर, आणि धारावी या परिसरात या सभा पार पडल्या.