मुंबई - नाणारमध्ये जमीन खरेदी करणाऱ्या समर्थकांचा मेळावा झाला असा आरोप राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भारतीय जनता पक्षावर केला आहे. तसेच जमीन खरेदी खरेदी करणाऱ्यांमध्ये नेपाळमधील लोकांचा समावेश असल्याचेही ते म्हणाले आहेत.
नाणारप्रकरणी भाजप नेते प्रमोद जठार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला होता. जठार यांच्यावर पलटवार करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नाणारमध्ये आलेले समर्थक हे जमीन खरेदी करणारे होते. यामध्ये प्रामुख्याने नेपाळमधील नागरिकांचा समावेश आहे. तसेच याबाबतचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचेही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा - 'मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा सरकारसमोर आलाच नाही, विरोधकांनी उगाच 'एनर्जी' फुकट घालवू नये'
नाणारमध्ये प्रमोद जठार यांनी मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला होता. याच मेळाव्यात प्रमोद जठार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करून शिवसेनेचा या प्रकल्पाला छुपा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देत मंत्री उदय सामंत यांनी या मेळाव्यामध्ये दोनशे लोक सहभागी झाले होते. हे सर्व नेपाळी लोक होते त्यांच्या गळ्यामध्ये शिवसेनेचे फोटो झेंडे लावून पाडण्यात आले होते. या विनाशकारी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.