मुंबई Mumbai Delhi Pollution : मुंबई दिल्लीच्या धर्तीवर प्रदूषणाची पातळी नियमित राखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, उल्हासनगर ,कल्याण डोंबिवली या तीन महानगरपालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर नागरपरिषद तसंच मुरबाड, शहापूर नगरपंचायती, प्रदूषण नियंत्रण मंडळ ,बांधकाम व्यावसायिक,पोलीस, आरटीओ या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कल्याण झोनचे मुख्य अधिकारी एल. एस. भड यांनी दिली आहे. दरम्यान, या बैठकीमध्ये प्रदूषण थांबवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असल्याची माहितीही भड यांनी दिली.
उपाययोजना राबवण्यास सुरुवात : दिवसेंदिवस राज्यात प्रदूषणाचा वाढता धोका पाहता राज्य शासनामार्फत काही निर्देश जारी झाले आहेत. त्यानुसार मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्हातील विविध शहरात उपाय योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हात विविध शहरांसह कल्याण डोंबिवलीत मोठ्या प्रमाणात गृहसंकुलांचीच कामं सुरू आहेत. त्या बांधकामांमुळेदेखील वायू प्रदूषण होतंय. या अनुषंगाने बांधकामांना लागणारं साहित्य वाहतूक करताना ते ताडपत्रीनं ते झाकून आणावं, तसंच हे साहित्य जेव्हा बांधकाम साईटवर उतरवलं जातं, त्यावेळेस आजुबाजूला धूळ होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना बांधकाम व्यावसायिकांना दिल्या आहेत. दरम्यान, महानगरपालिकेच्या हद्दीत कुठल्याही प्रकारे कचरा जाळण्यात येणार नाही या अनुषंगाने सहाय्यक आयुक्तांना, उपाभियत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी पथकं तयार केली जात आहेत.
25 ते 50 हजार रुपये दंडही ठोठावण्यात येणार : यासंदर्भात मुंबईमध्ये आरएमसी प्लांटला नोटीस देण्यात आली असून या अनुषंगानं महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोणते कोणते आरएमसी प्लांट आहेत याबाबत माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बांधकामाचं साहित्य अनलोड करताना धूळ उडण्याचं प्रमाण चिंताजनक आहे. ही धूळच वायूप्रदूषण आणि पर्यायाने अनेक आजारांना निमंत्रण देते. यावर प्रतिबंधात्मक उपाय काय असावेक, याबाबत मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आली आहेत. प्रतिबंधकात्मक कारवाईसाठी महापालिका वेगळं धोरण आखते. या धोरणान्वये वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिबंधकात्मक कारवायांची तरतूद करण्यात आली आहे. यात दंडात्मक कारवाईचाही समावेश आहे. गुन्ह्याच्या गांभीर्यानुसार, 25 ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहेत.
सार्वजनिक स्थळी वावरण्यासाठी खालील सूचना जारी करण्यात आल्या आहेत :
- मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळी घराबाहेर चालणं टाळा.
- सकाळी आणि संध्याकाळी घराचे दरवाजे अन् खिडक्या उघडू नका.
- दुपारी 12 ते 4 या वेळेतच शक्यतो बाहेर पडावं.
- मास्क वापरण्याला प्राधान्य द्यावं.
- लाकूड, कोळसा, आणि अन्य ज्वलनशील गोष्टी जाळणे टाळा.
- दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके फोडणं टाळा.
हेही वाचा -