मुंबई - गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाने कोरोनाच्या संकटात दहीहंडी फोडून मिळवलेल्या बक्षिसांच्या रोख रकमेतून जनतेला मदत करण्यास सुरुवात केली आहे.
या मदतीत रक्तदान शिबीर, मास्क वाटप हॉस्पिटलमधील नातेवाईकांना जेवणवाटपासह मालाड गोरेगाव मधील आदिवासी कुटुंबांना धान्य वाटप करून आपले सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे.
192 बाटली रक्तसंकलन, 2 हजार माक्स वाटप, केईम आणि टाटा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना जेवण वाटप, 100 आदिवासी कुटुंबाना धान्यवाटप, 1200 स्थानिक गरजू कुटुंबाना धान्य स्वरूपात मदत, अहोरात्र सेवा करणाऱ्या पोलिस बांधवांना चहा, नाश्ता, 50 पेक्षा जास्त शौचालय मध्ये फवारणी आदी मदत या मंडळाकडून करण्यात येत असल्याचे प्रशिक्षक संदीप भरत ढवळे यांनी सांगितले.