ETV Bharat / state

Mumbai Crime News : मुंबईत माफिया अतिक अहमदच्या नावानं गोळीबार, जमीन हडपण्याचा प्रयत्न - Mumbai Crime

Mumbai Crime News : मुंबईत माफिया अतिक अहमदच्या नावानं गोळीबार करणाऱ्या गुंडाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तो स्वत:ला अतिक अहमदचा भाऊ असल्याचं सांगत लोकांचा जमिनी बळकावत होता.

Mumbai Crime News
Mumbai Crime News
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 2:51 PM IST

हेमराजसिंग राजपूत, पोलीस उपायुक्त

मुंबई Mumbai Crime News : कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची १५ एप्रिलला उत्तर प्रदेशात हत्या करण्यात आली होती. मात्र अजूनही त्यांच्या नावानं मुंबईत लोकांना धमकावलं जातंय.

अतिकच्या नावानं गोळीबार करणाऱ्याला अटक : नुकतेच मानखुर्द पोलिसांनी गोळीबाराच्या आरोपाखाली मुस्तकीम अहमद शेख नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं. तो पिस्तूलाच्या बळावर लोकांच्या जागा हडपत होता. ३ सप्टेंबरला त्यानं या परिसरात गोळीबार केला. तो एक राऊंड फायरिंग करत म्हणाला, 'मी माफिया डॉन अतिक अहमदचा भाऊ आहे. मी कोणालाही जिवंत सोडणार नाही'. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. भारतीय दंड संविधान कलम ३०७, ३२३, ५०४ आणि ५०६ (२) अंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : Crime News : एकाच कुटुंबातील ४ जणांची चाकू आणि विळ्यानं निर्घृण हत्या

अतिकचा भाऊ असल्याचा दावा : आरोपी मुस्तकीम अहमद शेख हा मानखुर्द परिसरातील लोकांना त्रास देत असे. तो माफिया अतिक अहमदच्या नावानं धाक दाखवून लोकांच्या जमिनी बेकायदेशीरपणे बळकावण्याचा प्रयत्न करत होता. तो स्वत: अतिकचा भाऊ असल्याचा दावा करत होता. त्याच्या या दादागिरीला जमीन मालकानं विरोध केला असता, मुस्तकीमनं स्वतःजवळ असलेल्या बंदुकीतून गोळीबार केला. त्यानंतर त्यानं जमीन मालक आणि आजूबाजूला जमलेल्या लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्ला कॅम्प मंडाला या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

पोलिसांचा तपास सुरू : गुन्हा दाखल केल्यानंतर मुस्तकीम अहमद शेख (वय 51) याला विशेष पथकानं तत्काळ अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेलार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुस्तकीम अहमद याचे काही कुख्यात गुंडांशी संबंध आहे का? तसेच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : Police Raped Lady Police : पिस्तुलचा धाक दाखवून पोलिसाचा महिला पोलिसावर वारंवार अत्याचार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.